Home /News /viral /

Alexa सर्वकाही...; आजीबाईची सूचना ऐकून अ‍ॅलेक्साही झाली कन्फ्युझ; पाहा मजेशीर VIDEO

Alexa सर्वकाही...; आजीबाईची सूचना ऐकून अ‍ॅलेक्साही झाली कन्फ्युझ; पाहा मजेशीर VIDEO

पहिल्याच भेटीत आजीने अ‍ॅलेक्साला दिली भलीमोठी लिस्ट.

  मुंबई, 21 सप्टेंबर : अ‍ॅलेक्सा (Alexa) हे कर.. अ‍ॅलेक्स ते कर... आपल्यापैकी बहुतेक जण अ‍ॅलेक्सावर अवलंबून आहे. किती तरी जणांच्या आयुष्यात आता अ‍ॅलेक्सा महत्त्वाची झाली आहे. त्यांची बहुतेक कामं अ‍ॅलेक्साच करते. जरा विचार करा एखाद्या आजीच्या हाती अ‍ॅलेक्सा लागली तर ती आजी त्या अ‍ॅलेक्साकडून काय कामं करून घेईल (Dadi giving instructions to alexa). सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Dadi alexa video). एका आजीबाईच्या हाती अ‍ॅलेक्सा लागली. त्यानंतर आजीने आपल्याला हवं ते काम अ‍ॅलेक्साला सांगितलं. किंबहुना आजीने आपल्या कामांची इतकी भरभर लिस्ट दिली की काय करावं ते अ‍ॅलेक्सालाही समजेना.
  आजी अ‍ॅलेक्साजवळ जाते तिच्याकडे पाहते. आजी पहिल्यांदाच अ‍ॅलेक्साला भेटली असं दिसतं. ती पहिल्यांदाच अ‍ॅलेक्सासोबत बोलत होती. अ‍ॅलेक्साशी काय आणि कसं बोलावं हे आजीला माहिती नव्हतं त्यामुळे सुरुवातीला तिचा नातू तिला मदत करतो. त्यानंतर आजी स्वत: अ‍ॅलेक्साला निर्देश देते. हे वाचा - VIDEO - डान्सिंग आजीने पुन्हा दाखवला आपला जलवा; नातीसोबत केला Cutiepie dance अ‍ॅलेक्सा गणपती भजन बोल, गणपती श्लोक बोल, गणपती स्तोत्र बोल, गणपती आरती बोल, गणपतीसंबंधी सर्वकाही बोलं अशी आपली भलीमोठी लिस्टच अ‍ॅलेक्साकडे देते. आजीची ही सूचना ऐकून अ‍ॅलेक्साही कन्फ्युझ झाली असावी. पण आजीने एकमद भारी अंदाजात अ‍ॅलेक्साला  सूचना दिल्या आहेत. या आजीने नेटिझन्सचं मन जिंकलं आहे. अ‍ॅलेक्साशी बोलणाऱ्या आजीबाईचा हा क्युट व्हिडीओ नेहा शर्मा या इन्स्टाग्राम युझरने आपल्या lifeneedsaholiday या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. आजी आणि अ‍ॅलेक्सा असं कॅप्शन तिनं दिलं आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. हे वाचा - प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होता नातू, आजीने शिकवला चांगलाच धडा; VIDEO VIRAL एका युझरने तर अ‍ॅलेक्साने काय उत्तर दिलं असावं याची कल्पनाही केली आहे. हो आजी मी तुमची सूचना नोट केली आहे, असं उत्तर अ‍ॅलेक्साने दिलं असावं, असं या युझरने म्हटलं आहे. काय आहे अ‍ॅलेक्सा? अ‍ॅलेक्सा हे अ‍ॅमेझॉनचं व्हर्चुअल असिस्टेंट आहे. अमेझॉनची ही Alexa आता भारतातही लोकप्रिय होत आहे.  अलेक्सा हे डिव्हिइस अलेक्स फायर टीव्ही स्टिक, अलेक्सा टीव्ही रिमोट फायर टीव्ही याडिशन, अॅमेझॉन अॅप व अलेक्सा अॅप  तसेच मोबाइल फोन, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट टीव्ही हेडफोन्स अशा थर्ड पार्टी डिव्हाइसमध्ये सुद्धा सपोर्ट करते.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या