Home /News /viral /

आजी-आजोबांच्या भन्नाट डान्सचे युझर्सही झाले दिवाने, VIDEO VIRAL

आजी-आजोबांच्या भन्नाट डान्सचे युझर्सही झाले दिवाने, VIDEO VIRAL

बिनधास्त डान्स करण्यासाठी वयाचं बंधन नसतं आणि आनंद साजरा करण्याचं मोल मोठं असतं हे या VIDEOकडे पाहून लक्षात येईल.

    मुंबई, 02 फेब्रुवारी: आपल्याला आनंद साजरा करायचा असेल तर तो कसाही कुठेही आणि केव्हाही साजरा करता येतो याचं उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या नृत्यानं उपस्थितांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या या वृद्ध जुळ्या भावडांनी तर भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावली. मनसोक्त डान्स करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं आपल्याला आवडत ते केलं आणि त्यातून आनंद मिळवला असा दृष्टीकोन असणाऱ्या या दोघांनीही डान्स करत आनंद साजरा केला. त्यांचं डान्स करताना उत्साह पाहून अनेकांचेही पाय थिरकले. त्यांच्या या डान्सनं तिथल्या वातावरण अधिक अल्हादयाक झालं. त्यांच्या ह्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला आहे. चांगल्या वाईट प्रसंगात आपण अनेकवेळा धडपडतो मात्र आपला आनंद आपणच शोधायचा असतो. तसा या वृद्ध आजोबा आणि आजीने त्यांच्या डान्समधून आनंद शोधला आहे. सोशल मीडियावर ह्या व्हिडिओला 301 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 36 हजार लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. 'THIS is how everyone should enjoy Life!!!' या कॅपशननं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या वृद्धांचा डान्स पाहून युझर्सही त्यांचे दिवाने झाले आहेत. हेही वाचा-VIDEO : याला म्हणतात डोकं ! उरावर बसलेल्या वाघाला त्याने असं पळवलं हेही वाचा-VIDEO : लेडी स्पायडरमॅन! जीवाची बाजी लावून महिलेने विहिरीतून श्वानाला वाचवलं
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Facebook, Social media, Video viral, Viral

    पुढील बातम्या