समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांसमोर वृद्ध कपलनं केला रोमँटिक डान्स, VIDEO VIRAL

समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांसमोर वृद्ध कपलनं केला रोमँटिक डान्स, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे समुद्रावर जाणं शक्यच झालं नाही. पण अनेकजण समुद्राचे जुने फोटो आणि व्हिडीओ अपलोड करून मिस करत असल्याचं सांगत आहेत. याच दरम्यान एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उसळणाऱ्या समुद्रासमोर प्रेमाची साक्ष देत वृद्ध कपलनं सुंदर डान्स केला आहे. त्यांचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील हॉलिवूड अभिनेत्रीनं या कपलचा व्हिडीओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता मागे रोमँटिक म्युझिक सुरू आणि हे वृद्ध कपल समुद्र किनाऱ्यावर डान्स करत आहे. एकीकडे समुद्राच्या लाटा समुद्राचा किनारा गाठण्यासाठी उसळून येत आहेत तर दुसरीकडे हे कपलं आपलं प्रेम डान्समधून व्यक्त करत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

I love, love ❤️🎥 @ryanpv02 // TikTok

A post shared by Jessica Chastain (@jessicachastain) on

हे वाचा-चोरनं दाखवली बंदूक, महिलेनं लादी पुसायच्या मॉबनं धू-धू धुतलं, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचवेळी या व्हिडिओवर लाखो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. हा खूप सुंदर व्हिडीओ असल्याचं युझर्सनी सांगितलं आहे. तर अनेक युझर्सनी प्रेमाचे इमोजी पोस्ट केले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला तुफान पसंती दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 7, 2020, 9:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading