मुंबई, 16 मार्च : आपली समाजव्यवस्था आजही पुरुषप्रधान आहे. सहाजिकच लग्नाच्या विविध विधी आणि रीतीरिवाजांमध्येही त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. वर-वधूनं एकमेकांना वरमाला घालताना वराचे मित्र त्याला उचलून घेतात आणि वधूला खूप कसरत करून वरमाला घालावी लागते हे त्याचंच एक गमतीदार उदाहरण म्हणता येईल. (Marriage Facebook post)
एका लग्नसोहळ्यात मात्र याच्या नेमकं उलट चित्र पहायला मिळालं. 'गोष्ट तशी साधीच' या फेसबुक पेजवर ही गोष्ट शेअर करण्यात आली आहे. शीतल मेटकर-वाटाणे या नृत्यांगना हे पेज चालवतात. अजिंक्य अब्रुक आणि पल्लवी डोंगरे यांच्या लग्नातील ही गोष्ट आहे. (gosht tashi sadhich Facebook page)
या पोस्टसोबतचा फोटो लक्ष वेधून घेतो. यात दिसतं आहे, की होणाऱ्या पत्नीला हार घालता यावा यासाठी पती तिच्या पायाशी डोकं झुकवत चक्क गुडघ्यावर बसला आहे. या लक्षवेधी फोटोसोबत शीतल यांनी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. (sheetal metkar shares marriage story)
त्या लिहितात, 'झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला..! ही ओळ आठवून, या नवऱ्यामुलाचा, शप्पथ, लाडच करावासा वाटला. खूप दिवसांपासून माझ्या मनात असलेली, आणि प्रत्येक वेळी डोक्यात जाणारी एक गोष्ट, या फोटोच्या निमित्ताने शेअर करते. (bridegroom bows on knees marriage)
कसय नं, लग्न जुळवतांना ठरवतांना, मार कुंडल्याबिंडल्या पाहून, त्यावर खंडीभर चर्चा होऊन, अमूक वाजून तमूक मिनिटांचा मुहूर्त ठरतो. (ajinkya abruk marriage story on Facebook)
नवरा-नवरी, वर्हाड्यांचा नट्टापट्टा, बँडबाजाबरात, नागीन-वाघीण डँस, आगतस्वागत, देवाणघेवाण, रुसवेफुगवे, फोटोबीटो, वेळेवरच्या विधी, इत्यादी आटोपून नवरदेव-नवरी फायनली वरमाला घेऊन एकमेकांसमोर उभे राहतात.
काहीही करतांना मनातले भाव जास्त महत्वाचे वाटतात, त्यामुळे एकतर, मी कर्मकांड/विधी फार मानत नाही. तरीही, ही एकमेकांच्या गळ्यात हार टाकण्याची कृती, मला लग्नाच्या अख्ख्या भापटपसाऱ्यातली सर्वात जास्त महत्वाची कृती किंवा विधी वाटते. कारण इथे दोघांनीही एकमेकांना समान आदर देत, इतरांनी मधे पकडून ठेवलेला, औपचारिकतेचा, इगोचा अंतरपाट दूर सारून एकमेकांना मनापासून स्विकारणे असतं.
हेही वाचा हे चॅलेंज फक्त महिलांनाच जमतंय पुरुषांना का नाही?
Single to Married ची ती ट्रांझिशन फेज असते, जी की तेवढ्याच हळुवारपणे, आणि मनापासून घडणे आवश्यक वाटते. ती ट्रांझिटरी फेज, आपल्यासोबतच्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती वा भावनांशी एकरूप होत, हृदयापासून अनुभवता यायला हवी, असं मला नेहमी वाटतं.
मात्र गेल्या काही वर्षांत, लग्नांमधे गमतीजमतीच्या नावाखाली सर्रास घडणारा (विकृत) प्रकार म्हणजे, ऐन नवरीने हार टाकण्याच्या वेळी नवरदेवाला उचलून घेत कल्लोळ करणे. मग मुलीचे भावंड मुलीला उचलतात आणि मग ती अकात करत, लाचारी पत्करून, नवरदेवाच्या गळ्यात कशीतरी वरमाला टाकते, अगदी फेकतेच.वरवर हलकंफुलकं वाटणारं हे धतिंगड, इनडायरेक्टली नवऱ्यामुलाचा ताठा, नवरीची लाचारी वगैरेला खतपाणी घालत असतं, हे मात्र कुणाच्या लक्षात येत नाही.
हेही वाचा जसप्रीत बुमराह अडकला लग्नबेडीत, संजनाबरोबरच्या पारंपरिक विवाहाचे फोटो आले समोर
A respectful Bow is the most Ideal Kingly Gesture, while welcoming a Queen in Life. हे सगळं वाचून कुणाला मी अगदीच रुढीवादी, खडूस वगैरे वाटण्याची दाट शक्यता आहे.पण तरी मला खरच मनापासून सांगावंस वाटतं, की विवाहबंधन हा एकमेकांना आदरपूर्वक स्विकारण्याचा भावनिक सोहळा असतो. आयुष्यात पुनः कधीच नं येणारे ते क्षण, शांतपणे,आत्ममग्न होऊन, मनापासून अनुभवून, जाणीवेत जपता यायला हवे. त्यासाठी, काही विशिष्ट हैदोस मात्र कटाक्षाने टाळायला हवेत.
शीतल यांनी पोस्टसोबत मॅन ओ रियल मॅन असा हॅशटॅगही सोबत दिलेला आहे. या पोस्टवर अनेकांनी या लहानशाच पण महत्त्वाच्या कृतीला आणि त्याबाबतच्या लिखाणाचं भरभरून कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Facebook, Marriage