Home /News /viral /

साबणात सापडलं 38 लाखांचं सोनं, VIDEO पाहून व्हाल हैराण

साबणात सापडलं 38 लाखांचं सोनं, VIDEO पाहून व्हाल हैराण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    तिरुचिरापल्ली, 05 ऑगस्ट : काही वर्षांपूर्वी साबणासोबत सोन्याचा एक ग्रॅमचं नाणं मिळेल अशा जाहिराती अनेक येत होत्या. आता तर साबणातून चक्क 38 लाखांचं सोनंचं मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घ्या. सोन्याची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात असाच प्रकार एका तरुणानं केला. त्यानं पकडलं जाऊ नये म्हणून साबणाच्या आतमध्ये सोनं लपवून त्यांची तस्करी करत होता. मात्र पोलिसांच्या तावडीतून मात्र सुटू शकला नाही. 38 लाखांचे सोबण तिरुचिरापल्ली इथल्या विमानतळावर जप्त करण्यात आल्याची माहिती एका युझरनं ट्वीट करून दिली आहे. हे वाचा-नागमोडी वळणावर ओव्हरटेक करायला गेला आणि घात झाला, अपघाताचा LIVE VIDEO या व्हिडीओमध्ये साबण उघडल्यावर त्यातून सोनं निघत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तस्करांनी एका प्रसिद्ध ब्रँण्ड असलेल्या साबणामध्ये सोनं लपवून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. विमानतळावर तस्करांना सुरक्षा कर्मचार्‍यांनी पकडले. नंतर साबणाची तपासणी केली असता त्यातून 38 लाख रुपयांचे सोने जप्त केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं असून लाईक केलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या