नवी दिल्ली, 25 मे : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कोणी प्रसिद्धीसाठी विचित्र, हटके व्हिडीओ बनवतात तर काहींचे कारनामे, चोरी, स्टंट, हे कॅमेऱ्यात कैद केले जातात. असे व्हिडीओ क्षणातच सोशल मीडियावर गराळा घालतात. दिवसाला असे अनेक व्हिडीओ येतात मात्र त्यातील काहीच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये चोरीचा थरार पहायला मिळत आहे.
समोर आलेला व्हिडीओ चोरी करतानाची आहे. यामध्ये चोरी करण्याची स्टाईल आणि निर्दयीपणा पाहून तुम्हीही शॉक व्हाल. धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती ट्रकमधून बकऱ्यांना निर्दयीपणे फेकताना दिसत आहे. क्लिपची सुरुवात हायवेवर जाणाऱ्या ट्रकमधून शेळ्या पडण्यापासून होते. याच महामार्गावरून धावणाऱ्या दुसऱ्या वाहनाच्या मोबाईल कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. प्रवासी किंवा बकऱ्यांच्या सुरक्षेची पर्वा न करता वेगवान ट्रकमधून प्राण्यांना निर्दयीपणे फेकले जात असल्याचं यात दिसतंय.
कानपुर उन्नाव हाइवे पे ट्रक से बकरे चोरी करने वाला गिरोह जो लग्जरी कार से चोरी कर रहा.... वीडियो गौर से देखिए........@Uppolice pic.twitter.com/ytC6m6owgI
— Mohit Sharma (@Mohit_Casual_) April 30, 2023
क्लिपमध्ये 10 शेळ्या ट्रकमधून फेकल्या. ट्रकमधून शेळ्या फेकणारा माणूस ट्रकमधून खाली उतरताना दिसतो आणि ट्रकच्या पुढे एक कार येते जिथे तो गाडीत बसण्यासाठी बोनेटवर उतरतो. नेटिझन्सच्या म्हणण्यानुसार, बकऱ्या चोरल्या गेल्या आणि नंतर उचलून कारमध्ये टाकल्या. हा व्हिडीओ खूपच निर्दयी असल्याचं पहायला मिळतोय.
दरम्यान, हा व्हिडीओ @Mohit_Casual_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, हा व्हिडीओ कानपूरमधील उन्नाव हायवेचा आहे. जिथे बकरी चोरी करणारा लग्झरी कारमध्ये आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Viral, Viral videos