मुंबई, 18 जानेवारी : एक हिरो एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर बाईक उडवत नेतो, फिल्ममधील असा स्टंटचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. पण एखाद्या प्राण्याला कधी असं डोंगर पार करताना पाहिलं आहे का? विशेषत: बकरीला. एरवी बें बें करत राहणाऱ्या या बकऱ्यांनी चक्क एका उडीतच डोंगर पार केला आहे. एका डोंगरावरून त्यांनी दुसऱ्या डोंगरावर उडी मारली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर उडी मारणाऱ्या स्टंटबाज बकऱ्यांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. @AnimalsWorId ट्विटर युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Family of goats jump over a mountain gap pic.twitter.com/KB3K7czOWl
— Nature & Animals🌴 (@AnimalsWorId) September 16, 2020
व्हिडीओ पाहू शकता, बकऱ्यांचं कुटुंब एका डोंगरावर उभं आहे. त्यांना दुसऱ्या डोंगरावर जायचं आहे. मध्ये एक दरी आहे. दरी पाहून या बकऱ्या मागे परततील असंच वाटेल. पण असं झालं नाही. बकऱ्यांनी डेअरिंग करून समोरच्या डोंगरावर उडी मारली. एकेएक करून बकऱ्या डोंगरातील दरी पार करतात. एक...दोन... तीन असं करून सहा बकऱ्या समोरच्या डोंगरावर जातात.
हे वाचा - आपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO
विशेष म्हणजे यामध्ये लहान बकऱ्याही आहेत. मोठ्या असो वा लहान एकाही बकरीचा पाय घसरत नाही. खोल दरी पाहून त्यांचे पायही डगमगत नाही किंवा त्यांना कोणती भीतीही वाटत नाही. काही बकऱ्या तर खाली न पाहता थेट समोर पाहूनच उडी मारतात. डोंगर पार करण्याचं जणू प्रशिक्षणच घेतलं असावं अशा पद्धतीनं बकऱ्या डोंगर पार करतात.
हे वाचा - पाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO
असा डोंगर पार करण्याआधीच माणसाचं काळीज धस्स होईल. त्याचे हातपाय लटपटू लागतील आणि शरीराला चांगलाच घामही फुटेल. माणसंही करू शकत नाही, असं डेअरिंग बकऱ्यांनी करून दाखवलं आहे. खरंच त्यांच्या हिमतीला दाद द्यायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pet animal, Viral, Viral videos