• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! उभ्या भिंतीवर सरसर चढल्या शेळ्या; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

OMG! उभ्या भिंतीवर सरसर चढल्या शेळ्या; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

जे माणसांना शक्य नाही ते चक्क शेळ्यांनी करून दाखवलं आहे (Goats climbing walls video).

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : पाल, झुरळ, कोळी अशा कीटकांना आपण उभ्या भिंतीवर चालताना किंवा सरपटताना पाहिलं आहे (Animal video_. पण कधी माणसं किंवा प्राणी-पक्ष्यांना उभ्या भिंतीवर चालताना पाहिलं आहे का? माणसं तशी वॉल क्लाइंबिंग करतात पण त्यावेळी ते कशाचा तरी आधार घेतात. कोणत्याही आधाराशिवाय भिंतीवर चढणं शक्यच नाही. पण जे माणसांना शक्य नाही ते चक्क शेळ्यांनी करून दाखवलं आहे (Goats climbing walls video). एका भिंतीवर शेळ्या (Goats video) चढताना दिसल्या. भिंतीवर चढणाऱ्या शेळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओत काही बकऱ्या एका धरणाऱ्या भिंतीवर चढताना दिसल्या. फक्त चढतानाच नाही तर त्या तिथं पळतही होत्या. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून हैराण व्हाल. किंबहुना तुमच्या तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओत सुरुवातीला तुम्ही पाहू शकता शेळ्या कशापद्धतीने भिंतीवर चढत आहेत. खरंतर तेव्हा तुम्हाला हे इतकं कठीण वाटणार नाही. पण जेव्हा या धरणाचा एरिअल व्ह्यू दिसतो तेव्हा शेळ्या जे काही करत आहे ते किती कठीण आहे याचा अंदाज येईल. शेळ्या भिंतीवर फक्त चढत नाहीत तर पळतानाही दिसत आहेत. हे वाचा - VIDEO - आकाशातून झेपावलेल्या ससाण्याशी भिडली बकरी; कोंबडीच्या पिल्लाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं सुशांत नंदा यांनी ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या माऊंटन शेळ्या  (Mountain Goats) आहेत. इटलीतील एका शेकडो फूट उंच धरणाच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे.  काही जणांना हे अद्भुत वाटलं तर काही जणांना खतरनाक. निसर्ग किती अद्भुत क्षमता देतं, निसर्गाने बनवलेले हे अद्भुत जीव आहेत, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मांसाहार करणाऱ्या बकऱ्यांचाही व्हिडीओ समोर आला झाला होता. बकरी झाडाचा पालापाचोळा खाते. तुम्ही अनेकदा बकरीला चारा खाताना पाहिलंही असेल. मात्र बकरी अंडी खात असेल तर... तुमचा विश्वास बसणार नाहीपण सांगलीत चक्क बकरी अंडी खाते. दत्तात्रय जाधव यांच्या फार्महाऊसमधील बकरी अंडी खाते.जाधव यांच्या बकरीच्या शेडच्या बाजुला ठेवलेली अंडी काही दिवसांपासून गायब होत होती. अंडी कोण नेतं याचा शोध लागत नव्हता. अनेक दिवस हाच प्रकार सुरू होता. त्यामुळं वैतागलेल्या जाधव यांनी अंडी गायब का होतात. या कारणांचा शोध घेण्याचं ठरवलं.त्यासाठी त्यांनी अंडी ठेवलेल्या जागेवर नजर ठेवली.  त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं.कारण अंड्याच्या बाजुला असलेली बकरीचं अंडी फस्त करत असल्याचं समोर आलं. एका मागून एक बकरी अंडी खात असल्याचं जाधव यांच्या लक्षात आलं. आणि अंडी गायब कुठे होतात याचा खुलासा झाला. हे वाचा - I LOVE YOU म्हणत सापालाच KISS देत राहिली आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल शेडमधील बकरीच अंडी खात असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नियमीत बकरीला अंडी देण्यास सुरुवात केली. जाधव यांच्या शेडमधील ही बकरी आता रोज अंडी खाते. बकरीचा मालकही तिला रोज न चुकता अंडी खायला घालतो. बकरी अंडी खात असल्याचं पाहून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला.
  Published by:Priya Lad
  First published: