Home /News /viral /

अरे देवा! मेंढ्या-बकऱ्यांचा शहरात धुमाकूळ, नागरिकांना केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL

अरे देवा! मेंढ्या-बकऱ्यांचा शहरात धुमाकूळ, नागरिकांना केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL

तुर्कीच्या नेवशाइर या शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लोक पळत आहेत आणि त्यांच्या मागे मेंढ्या-बकऱ्यांचा कळप पाठलाग करत आहे.

    इस्तानबुल, 17 डिसेंबर : जंगलात खायला मिळालं नाही भूक लागली की प्राणी हैदोस आणि नासधूस करायला सुरुवात करतात अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण चक्क बकऱ्या आणि मेंढ्यांनी शहरात घुसून धुमाकूळ घातला आहे. शहरावर ताबा मिळवत या प्राण्यांनी दिसेल त्याला मारत सुटायचं हा नित्यक्रम चालू केल्यानं नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. तुर्कीच्या नेवशाइर या शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लोक पळत आहेत आणि त्यांच्या मागे मेंढ्या-बकऱ्यांचा कळप पाठलाग करत आहे. शेळ्या-मेंढ्यांचा कळप कुणीही माणूस दिसलं की त्याच्यावर हल्ला करत सुटलाय त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झाला. शहरात काही तास त्यांनी हा धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली आणि लोकांचं रस्त्यावर फिरणं अवघड करून टाकलं. हे वाचा-उत्खननादरम्यान सापडला मानवी कवट्यांचा ढीग डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार Nevsehir City Hall या परिसरात मेंढ्या-बकऱ्यांनी हा धुडगूस घातला होता. घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कळपानं हे प्राणी हल्ला करत होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना मागच्या सोमवारी घडल्याचं देखील सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता या व्हिडीओमध्ये मोठी बकरी लोकांना जोरात मारत आहे आणि त्यांचा पाठलाग देखील करत आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला ही बकरी मारत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या