मराठी बातम्या /बातम्या /Viral /सरकारी कर्मचारी आराम करत राहिले अन् ऑफिसमध्ये घुसून शेळीने लंपास केली फाईल; पाहा पुढे काय घडलं, VIDEO

सरकारी कर्मचारी आराम करत राहिले अन् ऑफिसमध्ये घुसून शेळीने लंपास केली फाईल; पाहा पुढे काय घडलं, VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये (Kanpur Goat Viral Video) पाहायला मिळतं, की एक शेळी ब्लॉक ऑफिसच्या आत शिरते आणि तिथे ठेवलेल्या फाईल आपल्या तोंडात धरून तिथून पळ काढते (Goat Eats Govt File Video).

व्हायरल व्हिडिओमध्ये (Kanpur Goat Viral Video) पाहायला मिळतं, की एक शेळी ब्लॉक ऑफिसच्या आत शिरते आणि तिथे ठेवलेल्या फाईल आपल्या तोंडात धरून तिथून पळ काढते (Goat Eats Govt File Video).

व्हायरल व्हिडिओमध्ये (Kanpur Goat Viral Video) पाहायला मिळतं, की एक शेळी ब्लॉक ऑफिसच्या आत शिरते आणि तिथे ठेवलेल्या फाईल आपल्या तोंडात धरून तिथून पळ काढते (Goat Eats Govt File Video).

नवी दिल्ली 02 डिसेंबर : सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल की काही सरकारी कर्मचारी अतिशय बेजबाबदार असतात. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील ब्लॉक ऑफिसचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये (Kanpur Goat Viral Video) पाहायला मिळतं, की एक शेळी ब्लॉक ऑफिसच्या आत शिरते आणि तिथे ठेवलेल्या फाईल आपल्या तोंडात धरून तिथून पळ काढते (Goat Eats Govt File Video).

सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे जेव्हा ही शेळी ऑफिसमध्ये शिरून फाईल घेऊन जाते तेव्हा ऑफिसमधील कर्मचारी आराम करत होते. कानपूरच्या ब्लॉक ऑफिसमधून सरकारी फाईल घेऊन पळणाऱ्या या शेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी कर्मचाऱ्यांवर टीका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा शेळी फाईल घेऊन जात होती तेव्हा कर्मचारी ऑफिसमध्ये कामच करत नव्हते. तर ते थंडीपासून वाचण्यासाठी बाहेर खुर्चीवर ऊन घेत बसले होते. व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता की शेळी आरामात फाईलमधील पानं खात आहे. बराच वेळ ती फाईलमधील पाने चावत राहते.

काही वेळानंतर कर्मचाऱ्यांचं या शेळीवर लक्ष जातं आणि मग त्यांना समजतं की या ऑफिसमधील फाईल आहेत. यानंतर ते शेळीजवळ जात फाईल घेण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कर्मचारी जवळ येताच शेळी तिथून पळ काढते. शेळी ब्लॉक ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच पळवताना दिसते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेळी इकडून-तिकडे धावत आहे. तिला पकडण्यासाठी एक कर्मचारीही तिच्या मागे धावत आहे. अनेक प्रयत्नानंतर अखेर हा कर्मचारी शेळीच्या तोंडातून ही फाईल काढून घेतो. मात्र तोपर्यंत शेळीने चावून चावून या फाईलची वाईट अवस्था केलेली असते. यादरम्यान कोणीतरी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. ट्विटरवर हा व्हिडिओ @apnarajeevnigam नावाच्या व्यक्तीने पोस्ट केला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 31 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

First published:

Tags: Goat, Video Viral On Social Media