Home /News /viral /

लेकींना कुटुंबाकडूनच लाथाबुक्क्यांनी मारहाण; सलग 2 दिवस देश हादरवणाऱ्या घटनांचे VIDEO आले समोर

लेकींना कुटुंबाकडूनच लाथाबुक्क्यांनी मारहाण; सलग 2 दिवस देश हादरवणाऱ्या घटनांचे VIDEO आले समोर

मुली या घरातील लक्ष्मी मानणाऱ्या आपल्या देशात त्यांना इतकी क्रूर वागणूक दिली जात आहे. हे दोन्ही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता कुटुंबाकडूनच महिलांची सुरक्षा करावी लागणार की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुढे वाचा ...
    मध्य प्रदेश, 4 जुलै: गेल्या अनेक दिवसात क्षुल्लक कारणांवरुन घरातील लेकींना मारहाण केली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहे. काल एका घटनेत तरुणीला तिचे वडील आणि भावांनी झाडाला लटकवून एखाद्या जनावरांप्रमाणे मारहाण केली. त्यानंतर मध्य प्रदेशातील आदिवासी भागातून एक घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन तरुणींना अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. याचा एक व्हिडीओही शूट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तरुणीला दोन पुरुषांकडून मारहाण केली जात आहे. इतकच नाही तर कुटुंबातील महिलाही त्यांना मारताना दिसत आहेत. या तरुणीला दगड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तरुणी आपल्या मामाच्या कुटुंबातील दोन मुलांशी फोनवर बोलत होत्या. यावर कुटुंबीय नाराज झाले व त्यांनी मुलींना मारहाण केली. यानंतर मुली अत्यंत घाबरलेल्या आहेत. मुलींना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर सात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (girls was beaten by his family) मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) आलीराजपुरमध्ये अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीला तिचे भाऊ आणि वडिलांनी अत्यंत निघृणपणे मारहाण केली. ती घरात नसल्यामुळे भाऊ व वडील चिडले होते. ती पळून गेल्याची शंका आल्यानं त्यांनी तिला बेदम मारलं. यानंतर आरोपींनी तरुणीला झाडावर टांगून आणि बांबूने मारहाण केली. (father and brothers brutally beat the young woman by hanging her from a tree) या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. येथे उभे राहून पाहणाऱ्यांपैकी एकाने हा व्हिडीओ शूट केला व सोशल मीडियावर शेअर केला. हे ही वाचा-आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ मुली या घरातील लक्ष्मी मानणाऱ्या आपल्या देशात त्यांना इतकी क्रूर वागणूक दिली जात आहे. हे दोन्ही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता कुटुंबाकडूनच महिलांची सुरक्षा करावी लागणार की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shocking viral video, Women

    पुढील बातम्या