Home /News /viral /

विचित्र ट्रेंड! प्रायव्हेट पार्टमध्ये चिकन सूप इंजेक्ट करतायेत तरुणी, समोर आलं धक्कादायक कारण

विचित्र ट्रेंड! प्रायव्हेट पार्टमध्ये चिकन सूप इंजेक्ट करतायेत तरुणी, समोर आलं धक्कादायक कारण

लोक इंजेक्शनद्वारे चिकन सूप (Chicken Soup Injection) त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकत (Private Part Injection) आहेत. यामुळे फिगर आकर्षक ( figure attractive ) बनते, असा त्यांचा विश्वास आहे

नवी दिल्ली 14 जानेवारी : आजपर्यंत तुम्ही चिकन सूप (chicken soup) प्यायला असाल. पण तुम्हाला माहिती आहे का, की आफ्रिकेत ( Africa ) एक विचित्रच फॅशन ट्रेंड ( fashion trend ) फॉलो केला जात असून तो चिकन सूप (Chicken Soup) संबंधित आहे. आफ्रिकन लोक इंजेक्शनद्वारे चिकन सूप (Chicken Soup Injection) त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकत (Private Part Injection) आहेत. यामुळे फिगर आकर्षक ( figure attractive ) बनते, असा त्यांचा विश्वास आहे. याबाबतची माहिती ट्विटरवर शेअर करण्यात आली असून ती वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म ( Social media platform ) बनला आहे, ज्यावर जगभरातील माहिती, बातम्या शेअर केल्या जातात. त्यावर अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्याही व्हायरल होतात. सोशल मीडियामुळे अनेक विचित्र गोष्टीही ट्रेंडमध्ये येऊ लागतात. सध्या असंच एक फॅशन स्टेटमेंट ट्रेंडमध्ये आहे. नायजेरियातील (Nigeria) एका डॉक्टरने ट्विटरच्या माध्यमातून नुकतीच माहिती दिली की, चुकूनही तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चिकन सूप इंजेक्ट करू नका. दिवसाढवळ्या तरुणीच्या डोळ्यात फेकली धूळ, पाठमोरी होताच पळवली स्कूटी, Video आफ्रिकन फॅशनप्रेमी (African Fashion Lovers) आजकाल इंजेक्शनद्वारे त्यांच्या शरीरात चिकन सूप टाकत आहेत. शरीरात इंजेक्शनद्वारे टाकण्यात आलेले चिकन सूप गोठतं आणि यामुळे प्रामुख्याने मुलींची फिगर आकर्षक बनते, असे म्हटलं जातंय. पण नायजेरियाच्या डॉक्टरांनी लोकांना या पद्धतीने चिकन सूप शरीरात अजिबात टाकू नये, असं आवाहन केलंय. असं करणं खूप धोकादायक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिकन लोक बाजारात मिळणाऱ्या स्टॉक क्यूब्सचे इंजेक्शन घेत आहेत. यामध्ये मॅगी, मीठ, साखर, काळी मिरी, तेल आणि अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ मिसळले जातात. त्यांचे द्रवात रूपांतर करून लोक ते इंजेक्शनमध्ये भरतात आणि नंतर ते त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टोचतात. यामुळे लोकांच्या पुढे अनेक समस्या उद्भवू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मुलींना तर या इंजेक्शनचं एकप्रकारे व्यसन लागलं आहे. फॅशनच्या नावाखाली हा धोकादायक ट्रेंड वर्षानुवर्षे फॉलो केला जातोय.

Shocking! कानातून येत होते अजब आवाज; आत डॉक्टरांना दिसला भलताच जीव

सुंदर व आकर्षक दिसावं या कारणासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकाराचे उपाय करत असतात. आफ्रिकेत मात्र फॅशनच्या नावाखाली चिकन सूप प्रायव्हेट पार्टमध्ये इंजेक्ट करण्याचा विचित्रच प्रकार केला जातोय. याची माहिती ट्विटरवर शेअर करण्यात आल्यानंतर या प्रकाराची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झालीय. फॅशनच्या नावाखाली कोण काय करेल, याची काही नेम नाही, हे मात्र खरं!
First published:

Tags: PRIVATE part, Shocking news

पुढील बातम्या