• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बॉयफ्रेंड तुझा का माझा गं? म्हणत धरल्या एकमेकींच्या झिंझ्या, तुंबळ हाणामारीचा Video Viral

बॉयफ्रेंड तुझा का माझा गं? म्हणत धरल्या एकमेकींच्या झिंझ्या, तुंबळ हाणामारीचा Video Viral

एका बॉयफ्रेंडवरून दोन मुलींमध्ये हाणामारी (girls fight on Boyfriend) झाल्याची घटना घडली आहे. चक्क एका शॉपिंग मॉलमध्ये या मुलींनी बॉयफ्रेंडवरून चांगलाच गोंधळ घातला.

 • Share this:
  मुजफ्फरपूर, 21 सप्टेंबर : आपण नेहमी काही कारणांवरून मुलं एकमेकांशी भांडताना किंवा हाणामारी करताना पाहिली असतील. पण जर मुलींनी (girls fight video) एकमेकींचे केस पकडत शिवीगाळ, हाणामारी केली आणि तेही सार्वजनिक ठिकाणी, असं चित्र अनेकांनी कधी पाहिलं नसेल. विशेष म्हणजे एका बॉयफ्रेंडवरून दोन मुलींमध्ये हाणामारी (girls fight on Boyfriend) झाल्याची घटना घडली आहे. चक्क एका शॉपिंग मॉलमध्ये या मुलींनी बॉयफ्रेंडवरून चांगलाच गोंधळ घातला. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे ही मुलींची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या मारामारीचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शहरातील मोतीझील येथील एका मॉल कॉम्प्लेक्समधील आहे. या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांना मारहाण करत आहेत आणि त्यांच्या भांडणाचे कारण एक मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, दोन मुली एकमेकींशी भांडत मारामारी करत आहेत. एक मुलगी बचावासाठी येते नंतर तिलाही मारहाण सुरू होते, तसेच एक मुलगा मध्यभागी बचाव करताना दिसतोय. हे वाचा - पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू मुलगी झाली ऑफिसर, सना गुलवानीचं अभूतपूर्व यश या व्हिडिओमध्ये आपण पाहु शकाल की, बराच वेळ या मुलींचे भांडण सुरू आहे. त्यांच्या आरडाओरडा करण्यामुळं आणि मारामारीमुळं तेथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मॉलमधील एक माणूस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आणि प्रकरण शांत करण्यासाठी हस्तक्षेप करतो आणि शेवटी शिवीगाळ करणाऱ्या या मुलींना मॉलमधून बाहेर काढले जाते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार हा वाद बॉयफ्रेंडवरून चालल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र, या प्रकरणात आतापर्यंत कोणाकडूनही पोलीस ठाण्यात लेखी अर्ज किंवा तक्रार देण्यात आलेली नाही.
  Published by:News18 Desk
  First published: