नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : प्रेमात धोका मिळाल्याचे अनेक किस्से आजपर्यंत तुम्ही ऐकले असतील. मात्र, आज समोर आलेली घटना थोडी वेगळी आहे. यात एक तरुण एकसोबतच सहा तरुणींच्या प्रेमात पडला होता आणि त्यांना डेटही करत होता (Man Dating 6 Girlfriends at a Time). मात्र, त्याची ही प्रेम प्रकरणं जास्त काळ चालू शकली नाहीत. कारण त्याच्या तीन गर्लफ्रेंड एकमेकींच्या संपर्कात आल्या आणि या तरुणाची पोलखोल झाली (Woman Finds Out About Cheater Boyfriend).
डेली मेलच्या वृत्तानुसार, या अनोख्या लव्हरच्या तीन गर्लफ्रेंड बेकाह, अबी आणि मॉर्गन यांचं वय 21 वर्षापेक्षा कमी आहे. मात्र या तिघीही एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या होत्या. एक दिवस मॉर्गनला आपल्या बॉयफ्रेंडवर संशय आला आणि तिनं त्याच्या लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. यासाठी तिनं सोशल मीडियाची मदत घेतली आणि बॉयफ्रेंडच्या पोस्टवर (Social Media Posts of Boyfriend) नजर ठेवली.
Ranu Mandal ची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा, आता व्हायरल होतोय हा VIDEO
सर्वात आधी मॉर्गनची मैत्री अबीसोबत झाली आणि नंतर तिला अबीकडूनच बेकाहबद्दल समजलं. तिघीही एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या होत्या मात्र त्यांना याची कल्पना नव्हती की तिघींचा बॉयफ्रेंड एकच आहे. मात्र संशय आल्यानं तिघींनीही मिळून बॉयफ्रेंडची पोलखोल करण्याचा निर्णय घेतला.
याचदरम्यान तिघींचा बॉयफ्रेंड त्यांच्यासोबत ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत होता. मात्र त्याला हे माहिती नव्हतं की या तिघीही मैत्रिणी आहेत आणि एकमेकींना चांगलं ओळखतात. एक दिवस तिघींनीही त्याला भेटण्यासाठी बोलावलं. जेव्हा हा तरुण तिथे पोहोचला तेव्हा आपल्या तिन्ही गर्लफ्रेंडला तिथे पाहून त्याला धक्का बसला. आता त्याचं बिंग फुटलं होतं. या तरुणाच्या कृत्यामुळे नाराज तिघींनीही आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
खुर्चीवर बसल्या बसल्याच आला मृत्यू, समोरच्या व्यक्तीलाही आली नाही कल्पना
या प्रेम कहाणीत आणखी एक ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा या युवतींना समजलं की त्यांचा बॉयफ्रेंड ३ नाही तर ६ मुलींना डेट करत होता. यातीलच तिघींची मैत्री झाली आणि तरुणाची पोलखोल झाली. या तिघींनीही आपली ही कथा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love story, Viral news