लंडन, 08 मार्च : प्रेमाची खरी कसोटी लागते ती घरच्यांची लग्नासाठी परवानगी मिळवताना. सामान्यपणे मुलाचं कुटुंब बऱ्याचदा लग्नासाठी तयार होतं पण मुलीच्या कुटुंबाला तयार करण्यासाठी बरेच पापड बेलावे लागतात. विशेषतः मुलगी ज्यांच्या काळजाचा तुकडा असते त्या वडिलांना मनवणं वाटतं तितकं सोपं नसतं. वडील आपल्या परीचा हात सहजासहजी कुणाच्याही हातात देत नाही. त्यासाठी संबंधित मुलाला काही वेळा तर परीक्षाही द्याव्या लागतात. पण एका बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडच्या वडिलांसमोर आपल्या लग्नासाठी अशी मागणी घातली की वडिलांनी नकार देणं दूर उलट ते ढसाढसा रडू लागले. तरुण आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
प्रत्येक मुलीच्या आईवडिलाला काय हवं असतं. आपली मुलगी लग्न करून चांगल्या घरात जावी, तिला चांगला, सुशिक्षित, श्रीमंत, तिचे सर्व लाड पुरवणारा, तिला आनंदी ठेवणारा नवरा भेटावा. पण काही वेळा हे सर्व असूनही मुलीचं प्रेम असेल तर पालकांच्या मनात धाकधूक असतेच. हीच धाकधूक दूर करण्याचा प्रयत्न या तरुणाने केला. त्याने अशा अंदाजात मागणी घातली की त्याचे होणाऱ्या सासऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
भरमंडपात वधूपक्षाशी घातली हुज्जत तरी या नवरदेवाचं होतंय कौतुक; पण का पाहा VIDEO
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हा तरुण गर्लफ्रेंडच्या वडिलांसोबत एका कारमध्ये बसला आहे. तो त्यांना त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर किती प्रेम करतो ते सांगतो. त्यानंतर मी तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो. मी तिच्यासाठी एक अंगठी खरेदी केली आहे. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे, तुमचा आशीर्वाद हवा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंतक तुमच्या मुलीवर प्रेम करत राहिन असं म्हणतो.
त्यानंतर मुलीचे वडील भावुक होतात. त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. अगदी लहान मूल रडावं तसं ते रडू लागतात आणि तरुणाला मिठीच मारतात.
'पापा की परी'ने वाजवला बाबाच्या लग्नाचा 'बँड'; 10 वर्षीय लेकीमुळे बापाला नेलं पोलीस ठाण्यात
GoodNewsCorrespondent ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी आपला अनुभवही मांडला आहे.
This man asked his girlfriend's dad for his marriage blessing. What a guy! 😭😭😭 (🎥:taliarycroft)
pic.twitter.com/VYq58r8uW1 — GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) March 2, 2023
तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडच्या वडिलांसमोर तिच्यासाठी कशी मागणी घातली होती किंवा कशी मागणी घालणार आहात ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Girlfriend, Viral, Viral videos