• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मोठ्या तोऱ्यात स्टंट करायला गेली आणि...; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची काय अवस्था केली पाहा VIDEO

मोठ्या तोऱ्यात स्टंट करायला गेली आणि...; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची काय अवस्था केली पाहा VIDEO

गर्लफ्रेंडची भलतीच हौस पुरवणं बॉयफ्रेंडला महागात.

 • Share this:
  मुंबई, 04 सप्टेंबर :  आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) खूश करण्यासाठी बॉयफ्रेंड (Boyfriend) काय काय करत नाही. त्यांच्या आवडीचं सर्वकाही करतात. त्यांना जे हवं ते देतात. त्यांचे सर्व हट्ट पुरवतात. पण अनेकदा गर्लफ्रेंडचे असे भलतेच हट्ट किंवा हौस पुरवणे बॉयफ्रेंडला (Girlfriend boyfriend video) चांगलंच महागात पडतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. गर्लफ्रेंड स्टंट (Girl stunt video) करायला गेली पण त्याचे परिणाम भोगावे लागले ते बॉयफ्रेंडला (Girl's stunt goes wrong). गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडवरच आपल्या स्टंट (Stunt on boyfriend) आजमावला आणि त्याची चांगलीच अवस्था केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काही बसेल आणि हसूही येईल. व्हिडीओत पाहू शकता, एक तरुण खुर्चीत डोळे बंद करून आरामात बसला आहे. तरुणी त्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेली प्लॅस्टिकची बाटली ठेवते. त्यानंतर ती तिथून दूर जाते. तिथं एक बॉल आहे. तरुणी बॉलला किक मारते आणि बॉयफ्रेंडच्या डोक्यावरील बाटलीवर नेम धरण्याचा प्रयत्न करते. आपण हे करूच अशा आत्मविश्वासाने तरुणी त्या बॉलला किक मारते खरं, पण पुढच्या क्षणी असं काही घडतं की तिच्या बॉयफ्रेंडला धक्काच बसतो. हे वाचा - गाढ झोपलेल्या बायकोला उठवण्यासाठी चक्क...; नवऱ्याचा भलताच उद्योग VIRAL तिचा नेम चुकतो आणि बॉल बाटलीऐवजी तरुणाच्या गालावर धाडकन आपटतो. तो वेदनेने गाल चोळत धाडकन उठतो.  गर्लफ्रेंडवर विश्वास ठेवून त्याने तिला स्टंट करायला दिला. पण तिचा स्टंट फसला आणि त्याच्या परिणामांना त्याला सामोरं जावं लागलं. गर्लफ्रेंडच्या स्टंटच्या नादात त्याची अवस्था बेकार झाली. काही वेळात आपल्यासोबत असं काही होणार आहे, याचा विचारही त्याने केला नसेल. हे वाचा - पठ्ठ्याने कमालच केली! हँडल नव्हे तर चक्क सीट पकडून चालवली बाईक; पाहा VIDEO होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: