मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नोकरीवर असतानाही बॉयफ्रेंडवर ठेवते नजर, कारण ऐकून लावाल डोक्याला हात

नोकरीवर असतानाही बॉयफ्रेंडवर ठेवते नजर, कारण ऐकून लावाल डोक्याला हात

जर तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तुम्ही कामावर असतानाही तुमच्यावर नजर ठेऊन असेल, तर काय वाटेल? सध्या एक तरुण नेमका हाच अऩुभव घेत आहे.

जर तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तुम्ही कामावर असतानाही तुमच्यावर नजर ठेऊन असेल, तर काय वाटेल? सध्या एक तरुण नेमका हाच अऩुभव घेत आहे.

जर तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तुम्ही कामावर असतानाही तुमच्यावर नजर ठेऊन असेल, तर काय वाटेल? सध्या एक तरुण नेमका हाच अऩुभव घेत आहे.

  • Published by:  desk news
न्यूयॉर्क, 26 डिसेंबर: एक तरुणी (woman) आपल्या बॉयफ्रेंडबद्दल (Boyfriend) इतकी पझेसिव्ह (Possessive) आहे की तो कामावर असतानाही ती त्याच्यावर सतत लक्ष (Monitoring) ठेऊन असते. व्हिडिओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून ती सतत त्याच्यासोबत असते आणि आपला बॉयफ्रेंड इतर कुठल्याही तरुणीच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घेत असते. तारुण्यात आपल्या पार्टनरबाबत अनेकजण पझेसिव्ह असल्याचं दिसतं. आपल्यापासून आपल्या जोडीदाराला कुणी हिरावून घेईल, ही भिती यामागे असते आणि आपल्याला जोडीदाराच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती असावी, असं त्यांना वाटत राहतं. मात्र जेव्हा याचा अतिरेक होतो, तेव्हा तो जोडीदाराच्या डोक्याला ताप व्हायला सुरुवात होते. 12 तास ठेवते नजर डेली स्टार वेबसाईटच्या रिपोर्टनुसार एका टिकटॉक युजरनं नुकतीच आपली आणि बॉयफ्रेंडची गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे. आपण आपल्या बॉयफ्रेंडबाबत इतके पझेसिव्ह आहोत, की सतत त्याच्यावर लक्ष ठेवून असतो, असं तिनं म्हटलं आहे. महिलेच्या बॉयफ्रेंडला सतत तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर हजर राहावं लागतं आणि त्याच्या प्रत्येक हालचालींवर तिची बारीक नजर राहते. विश्वास आहे तरीही महिलेचा बॉयफ्रेंड हा एका वेअर हाऊसमध्ये काम करतो. तिथं बॉक्स पॅक करण्याचं काम तो करतो. त्याच्या कार्यालयात काही तरुणीदेखील काम करतात. आपला आपल्या बॉयफ्रेंडवर पूर्ण विश्वास आहे, मात्र त्याच्या कार्यालयातील गर्लफ्रेंडवर नाही, असं महिला सांगते. त्यांनी आपल्या बॉयफ्रेंडला फूस लावण्याचा प्रयत्न करू नये, यासाठीच आपण सतत त्याच्यावर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नजर ठेवतो, असं तिचं म्हणणं आहे.  हे वाचा - कमेंट्सचा पाऊस तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार टीका केली असून बॉयफ्रेंडबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. बॉयफ्रेंडला जर त्याची स्पेस दिली नाही, तर तो लवकरच बोअर होईल आणि तुला सोडून जाईल, असा इशारा एकाने दिला आहे. तर कामाच्या दरम्यान व्हिडिओ कॉलवर राहणं योग्य नसून त्याचा त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.
First published:

Tags: Boyfriend, Girlfriend

पुढील बातम्या