बॉयफ्रेंडने व्हिडिओ कॉल न उचलल्याने भडकली 12 वर्षीय गर्लफ्रेंड; रागात केलेला प्रताप वाचून बसेल धक्का
बॉयफ्रेंडने व्हिडिओ कॉल न उचलल्याने भडकली 12 वर्षीय गर्लफ्रेंड; रागात केलेला प्रताप वाचून बसेल धक्का
अमेरिकेत राहणाऱ्या चिआरा केलॉग हिने नुकतंच आपल्या टिकटॉक अकाऊंट (@chiarakellogg) वरुन एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने आपल्या लहानपणीची एक हैराण करणारी घटना शेअर केली
नवी दिल्ली 19 जानेवारी : अनेक लोक प्रेमात (Love) पूर्णपणे आंधळे होतात. आपलं प्रेम मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. अनेकांना तर प्रेमात बरोबर आणि चूक यातील फरक कळणंही बंद होतं. लहान वयातच अनेक मुलांना असं वाटतं, की आपल्याला प्रेम झालं आहे आणि यातूनच ते अनेकदा अजब कृत्य करू लागतात. असंच काहीसं अमेरिकेतील एका 12 वर्षीय मुलीनं केलं. ज्या वयात मुलं पेन्सिल सोडून हातात पेन पकडायला शिकतात, त्या वयात तिने स्वतःलाच किडनॅप केलं (Girl Faked own Kidnapping). हे फक्त यासाठी कारण तिचा बॉयफ्रेंड तिचा व्हिडिओ कॉल (Video Call) उचलत नव्हता.
नुसता राडा! तरुणीने फोडल्या लाखो रुपयांच्या दारुच्या बाटल्या, पाहा VIDEO
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या चिआरा केलॉग हिने नुकतंच आपल्या टिकटॉक अकाऊंट (@chiarakellogg) वरुन एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने आपल्या लहानपणीची एक हैराण करणारी घटना शेअर केली. चिआराने सांगितलं, की जेव्हा ती 12 वर्षाची होती, तेव्हा तिने प्रेमात अतिशय विचित्र काम केलं होतं.
चिआराने सांगितलं, की 12 वर्षाची असताना तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत बोलत नव्हता आणि तिचा व्हिडिओ कॉल घेत नव्हता. यामुळे तिने अतिशय विचित्र पद्धत अवलंबली. तिने आपला असा फोटो बॉयफ्रेंडला पाठवला, ज्यात तिचे हातपाय बांधलेले होते. चिआराने सांगितलं, की तिच्या बॉयफ्रेंडने हे फोटो बघावे आणि काळजीपोटी लगेचच तिला व्हिडिओ कॉल करावा.
या व्हिडिओ आतापर्यंत 1 करोडहून अधिकांनी पाहिला आहे. चिआराने सांगितलं की तिच्या मैत्रिणीने तिला दोरीने बांधलं आणि मग तिच्या बॉयफ्रेंडला मेल पाठवला की व्हिडिओ कॉल उचल, नाहीतर काहीतरी वाईट होईल. बॉयफ्रेंड हा फोटो पाहून घाबरला.
महिलेनं त्या ईमेलचा स्क्रीनशॉटही टिकटॉकवर शेअर केला. यातून हे समजतं की ही घटना 2012 सालची आहे. या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की जेव्हा तो १२ वर्षाचा होता, तेव्हा त्यानेही असंच केलं होतं. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, की रूमपेक्षा एखाद्या गॅरेजमध्ये फोटो काढायला हवा होता. यामुळे फोटो आणखीच रिअल वाटला असता.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.