मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्यासोबत Reels बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIDEO

कुत्र्यासोबत Reels बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रील्स बनवत ही तरुणी आपल्या कुत्र्याला कुरवळत आहे. मात्र तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात करताच कुत्रा जोरात तिच्यावर भुंकतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामच्या रिल्सवर आजकाल अनेकजण आपले व्हिडिओ बनवून पोस्ट करतात (Instagram Reels Video). काही लोकांना तर व्हिडिओ अपलोड करण्याची इतकी आवड असते की ते आपला संपूर्ण दिवसही व्हिडिओ बनवण्यातच घालवतात. रील्स व्हायरल होण्यासाठी आजकाल लोक विचित्र आणि अनोख्या पद्धतीने व्हिडिओ (Weird Videos) बनवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतील. मात्र व्हिडिओ बनवण्याच्या नादात अनेकदा हे लोक स्वतःलाच अडचणीत टाकतात.

सध्या असाच एक व्हिडिओ रील्सवर पाहायला मिळाला. यात एक मुलगी आपल्या कुत्र्यासोबत रील्स बनवत होती (Reels with Dog). यादरम्यान असं काही घडलं की ती प्रचंड घाबरली आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर smriti.rajput1137 नावाच्या यूजरनं पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेड सूटमध्ये एक तरुणी इन्स्टाग्राम रील्स बनवत आहे. सोबतच तिचा कुत्राही आहे. ही तरुणी आपल्या कुत्र्यासोबतच रील्स बनवत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रील्स बनवत ही तरुणी आपल्या कुत्र्याला कुरवळत आहे. मात्र तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात करताच कुत्रा जोरात तिच्यावर भुंकतो. कुत्र्याने अचानक असं केल्यानं ही तरुणी घाबरते. व्हिडिओमध्ये या तरुणीचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे. यानंतर कुत्रा तिथून पळून जातो आणि ही तरुणी हसू लागते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. काही लोकांनी कमेंट करत म्हटलं की प्राण्यांवर एवढा विश्वास नाही ठेवायला पाहिजे. अन्यथा ते चावूही शकतात. तर काहींनी असंही म्हटलं की कुत्रा माणसापेक्षा अधिक समजदार आणि ईमानदार असतो. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Funny video, Video Viral On Social Media