मराठी बातम्या /बातम्या /Viral /धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभा राहून तरुणीचा विचित्र 'पराक्रम'; VIDEO पाहून संतापले नेटकरी

धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभा राहून तरुणीचा विचित्र 'पराक्रम'; VIDEO पाहून संतापले नेटकरी

शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या "हमरी शादी में" या लोकप्रिय गाण्यावर ही तरुणी काही बोल्ड डान्स मूव्ह्स दाखवत आहे. या तरुणीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या "हमरी शादी में" या लोकप्रिय गाण्यावर ही तरुणी काही बोल्ड डान्स मूव्ह्स दाखवत आहे. या तरुणीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या "हमरी शादी में" या लोकप्रिय गाण्यावर ही तरुणी काही बोल्ड डान्स मूव्ह्स दाखवत आहे. या तरुणीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 02 एप्रिल : लोक अनेकदा त्यांचं उत्कृष्ट नृत्य आणि कलाकारी दाखवून सोशल मीडियावर वापरकर्त्यांची मनं जिंकतात. इथे कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. बरेच लोक वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही लोकप्रिय होत नाहीत आणि बरेच लोक रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनतात. आता अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक स्वतःच्या जीवाशी खेळताना दिसतात.

बाईक स्टंटच्या नादात तिघांची झाली भयंकर अवस्था; अपघाताचा Live Video

अनेकवेळा असे व्हिडिओ ऑनलाइन समोर येतात, ज्यामध्ये लोकांचा मूर्खपणा स्पष्टपणे दिसून येतो. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती डान्स करताना दिसत आहे. आता डान्स करण्यात चुकीचं काय? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. मात्र ती ज्याठिकाणी डान्स करत होती, ते पाहून तुम्हीही हेच म्हणाल. ही तरुणी घरी किंवा रस्त्याच्या कडेला नाही तर चक्क धावत्या ट्रेनच्या उघड्या दरवाजाजवळ उभा राहून डान्स करत आहे.

शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या "हमरी शादी में" या लोकप्रिय गाण्यावर ही तरुणी काही बोल्ड डान्स मूव्ह्स दाखवत आहे. या तरुणीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर रुची सिंहने आपल्या अकाउंटवरून हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे बहुतांश लोक संतापले आहेत.

तरुणीच्या या वेडेपणावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पोस्टवरील कमेंट्स वाचल्यानंतर हे स्पष्ट होतं की बऱ्याच यूजर्सला हे कृत्य अजिबातही आवडलेलं नाही. ऑनलाइन शेअर केल्यापासून व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी या मुलीच्या वेडेपणावर जोरदार टीका केली आहे.

First published:
top videos

    Tags: Dance video, Shocking video viral