Home /News /viral /

Yuck! तरुणीने थुंकीने अनलॉक केला फोन; किळसवाणा पण शॉकिंग VIDEO

Yuck! तरुणीने थुंकीने अनलॉक केला फोन; किळसवाणा पण शॉकिंग VIDEO

थुंकीने मोबाईल फोन अनलॉक करण्याचं तरुणीचं विचित्र टॅलेंट पाहून सर्वजण हैराण

    मुंबई, 05 मे : आपला मोबाईल लॉक आणि अनलॉक करण्याची प्रत्येकाची स्टाइल वेगवेगळी असते. म्हणजे कुणी आपल्या मोबाईलला नंबर पासवर्ड ठेवतं, कुणी एखादं ड्रॅग पॅटर्न ठेवतं. कुणी आपल्या फिंगर प्रिंटने मोबाईल अनलॉक करतं. तर काही मोबाईलमध्ये फेस डिटेक्शननेही मोबाईल अनलॉक होतो. पण सध्या सोशल मीडियावर मोबाईल अनलॉक करण्याची विचित्र पद्धत व्हायरल होते आहे. जी पाहून तुम्ही हैराण व्हाल पण तुम्हाला उलटीही येईल (Girl unlock mobile phone with spit). एका तरुणीने चक्क आपल्या थुंकीने आपला मोबाईल अनलॉक केला आहे. तिच्यातील हे टॅलेंट जितकं शॉकिंग आहे तितकंच ते किळसावणंही आहे. व्हिडीओत पाहू शकता हा एका पबमधील व्हिडीओ आहे. तरुणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पबमध्ये एन्जॉय करते आहे. आपल्यातील हिडन टॅलेंट ती आपल्या मित्रमैत्रिणींना सांगते. इतकंच नव्हे तर ती ते टॅलेंट त्यांना प्रत्यक्षात दाखवतेही. तिच्या हातात मोबाईल आहे. तिला हा मोबाईल अनलॉक करायचा आहे. तिच्या मोबाईलवर काही नंबर्स दिसत आहेत. याचा अर्थ तिने नंबर पॅटर्न ठेवला आहे. हे वाचा - OMG! थेट ढगांनाच धडकली लाट; समुद्राचा कधीच पाहिला नसेल इतका अद्भुत VIDEO VIRAL आता तिने नंबर हाताने टाइप करणं अपेक्षित होतं. पण ती आपल्या हातात मोबाईल घेऊन त्यावर आपली थुंकी टाकते. जो पासवर्ड आहे, त्या त्या नंबर्सवर ती थुंकते. पाहताच आपल्याला उलटी आल्यासारखं वाटतं. पण हा व्हिडीओ तितका किळसवणारा आहे, तितकाच धक्कादायकही. कारण आश्चर्य म्हणजे तिचा मोबाईल अनलॉकही होतो. जे पाहून तिचे मित्रमैत्रिणीही ओरडतात. टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार या तरुणीचं नाव मिला मोनेट आहे. जिने आपल्यात असलेल्या या टॅलेंटचा व्हिडीओ शेअर केला होता. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही बऱ्याच लोकांना वेगळ्या पद्धतीने मोबाईल अनलॉक करताना पाहिलं असावं. पण अमेरिकेतील या तरुणीने जे टॅलेंट दाखवलं आहे ते कुणात नसावं. हे वाचा - कुणी धरले हात, कुणी धरले पाय आणि...; हळदीत मित्रांनी नवरीबाईसोबत केली नको ती मस्ती; VIDEO VIRAL काहींनी या तरुणीच्या या विचित्र टॅलेंटचं कौतुक केलं आहे. तर काहींनी याला किळसवाणं टॅलेंट म्हटलं आहे. एका युझरने तर आता यापुढे आपण दुसऱ्या कुणाच्या मोबाईलला हात लावण्यापूर्वी शंभर वेळा विचार करू असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Mobile, Mobile Phone, Viral, Viral videos

    पुढील बातम्या