Home /News /viral /

गाढ झोपलेल्या चिमुकलीवर चढला अजगर आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

गाढ झोपलेल्या चिमुकलीवर चढला अजगर आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

Girl sleeping with snake : चिमुकली झोपलेली असताना साप बेडवर चढला आणि...

  मुंबई, 29 जून : साप म्हटलं तरी मोठ्या माणसांनाही घाम फुटतो. असा साप प्रत्यक्षात समोर दिसला की थरकाप उडतो. विचार करा कुणी गाढ झोपेत असेल आणि एक भलामोठा साप आला तर काय होईल? असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे (Girl sleep with snake video). एक चिमुकली आपल्या घरात बेडवर शांत झोपली आहे. त्याचवेळी तिच्या बेडवर एक अवाढव्य साप येतो. पुढे काय घडतं ते तुम्हीच व्हिडीओ मध्ये पाहा. व्हिडीओत पाहू शकता, अंगावर पांघरूण घेऊन मुलगी गाढ झोपली आहे. तिच्या जवळ एक काळ्या रंगाचा साप आहे. सापाचा आकार पाहूनच काळजात आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. सापाची शेपटी मुलीच्या मानेवर आहे. तर त्याचं तोंड त्याने एका सॉफ्ट टाॅयवर ठेवलं आहे. हे वाचा - आजोबा-नातवाला चावला साप; रुग्णालयात नेताच असं काही घडलं की भीतीने रुग्णांसह कर्मचारीही पळाले व्हिडीओतील मुलीचा नाव एरियाना आहे. जिला साप खूप आवडतात. तिच्याकडे असे वेगवेगळे साप आहेत. ज्याचे व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम पेजवर आहेत. या सापांसोबत ती मस्ती करताना दिसते.
  लेक सापांसोबत खेळते, त्यांच्यासोबत राहते. याचं तिच्या पालकांनाही याचं काहीच वाटत नाही. उलट तिचे वडिल तिला असे वेगवेगळ्या प्रजातीचे साप आणून देतात. हे वाचा - बापरे! खेळता खेळता चिमुकलीने मानेभोवती गुंडाळला जिवंत साप; अंगावर काटा आणणारा VIDEO हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. यावर बर्‍याच कमेंट्स येत आहेत. हिच्या पालकांना काहीच कसा फरक पडत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर एकाने साप आपल्या खाण्याची तयारी करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अशी बरीच प्रकरण आहेत ज्यात पाळीव सापाने आपल्या मालकाची शिकार केली आहे. असं असताना आपल्या छोट्या मुलीला सापासोबत झोपण्याच्या पालकांच्या निर्णयाने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या