नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर: जगभरात बहुतांश लोक हे खाण्याचे शौकिन आहेत. अनेक पदार्थांच्या नावानेच अनेकजणांच्या तोंडाला पाणी सुटतं. या पदार्थांमध्ये कचोर या पदार्थाचीही समावेश आहे. आंबट, गोड, तिखट अशी चमचमीत चव असणाऱ्या कचोरीवरुन एका तरुणीने राडा घातला असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या या तरुणीच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ती कचोरीसोबत कांदा न दिल्याने भांडत असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर त्याला मारहाणदेखील करत असल्याचे पाहायला मिळते.
व्हायरल होणारा व्हिडीओ हा गार्डनमधील आहे. तरुणी खाद्यपदार्थ विक्रीकराकडे कचोरीची मागणी करते. तेव्हा तिला तो कचोरी देतो पण सोबत कांदा देत नाही. प्लेटमध्ये कांदा नाही म्हटल्यावर तरुणी विक्रीदाराला कांदा देण्यात सांगते मात्र, तो कांदा संपला आहे असे सांगतो. ते ऐकताच तरुणी भलतीच भडकते. उलट सुलट सवाल करत त्याच्याशी वाद मारु लागते.
जेव्हा तो तरुणीला समजावत पैसे देण्यास सांगतो तेव्हा तरुणीचा संयम सुटला आणि तिने दुकानदाराच्या सायकलला लाथ मारली. त्यामुळे सायकलवरील दुकानदाराचे सर्व सामान जमिनीवर पडून खराब झाले. दुकानदार त्याच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत बोलतो तर त्याला ती मारहाण करते. तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तीला ट्रोल करण्यात येत आहे.
Wo stree hai kuch bhi kar sakti hai pic.twitter.com/IyLB45sZzk
— Sarcastic Caravan ™ (@Saffron_Smoke) November 7, 2021
तसेच ती व्हिडीओ बनवणाऱ्यावरही भडकली असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ बंद कर नाही तर तुलाही कानाखाली मिळेल अशी धमकी देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Social media, Viral photo, Viral video.