मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चपाती गोलच का करायची? वैतागलेल्या तरुणीनं VIDEO शेअर करत काढला राग

चपाती गोलच का करायची? वैतागलेल्या तरुणीनं VIDEO शेअर करत काढला राग

अंकिताचं म्हणणं असं आहे, की चपाती गोल असो किंवा एखाद्या देशाच्या नकाशासारखी, शेवटी ती जाणार तर पोटातच आहे. वैतागलेली अंकिता अतिशय विनोदी अंदाजात किचनमधील रोजची स्टोरी सांगत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 जुलै: भारतातील सर्वच घरांमध्ये गोल चपाती याला एक वेगळंच महत्त्व असतं. चपातीचा आकार (Chapati Shape) थोडाही बिघडला की लोक वेगळेच हावभाव द्यायला लागतात. कोणी चपाती बनवायला शिकत असेल तर त्या व्यक्तीलाही गोल चपाती बनवण्याचंच टेन्शन असतं. लग्नानंतर तर नवरीकडून गोल चपातीचीच (Round Chapati) अपेक्षा केली जाते. याच संपूर्ण परिस्थितीवर अंकिता सहगल नावाच्या एका तरुणीनं व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. ही तरुणी भारतीयांच्या गोल चपातीवरील प्रेमामुळे वैतागली आहे. तिच्या या रागाचा फनी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

...अन् आईनं लहान बाळाला पाण्यात फेकलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले राक्षस

या व्हिडिओमध्ये अंकिता गोल चपातीबाबत आपलं दुःख व्यक्त करत आहे. तिचं म्हणणं समजणं अतिशय सोपं आहे, कारण गोल चपाती हा प्रत्येक घरातील एक महत्त्वाचा पदार्थच बनला आहे. अंकिताचं म्हणणं असं आहे, की चपाती गोल असो किंवा एखाद्या देशाच्या नकाशासारखी, शेवटी ती जाणार तर पोटातच आहे. वैतागलेली अंकिता अतिशय विनोदी अंदाजात किचनमधील रोजची स्टोरी सांगत आहे.

VIDEO: लग्नातच वैतागली नवरीबाई; नवरदेवासोबत केलं असं काही की सगळेच अवाक

तिचं असं म्हणणं आहे, की मुलींना लग्नाच्या आधीच गोल चपातीसाठी वारंवार टेन्शन दिलं जातं. लग्नाची तारीख ठरताच तिच्यावर प्रेशर निर्माण केलं जातं आणि तिला गोल चपाती बनवायला शिकवलं जातं. अंकिताचं असं म्हणणं आहे, की चपाती गोल झाली की आनंदाच्याभरात लोक चक्कर येऊन पडतात आणि मग त्यांना शुद्धीवर आणावं लागतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 2 लाख 15 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर लोक यावर विविध कमेंटही करत आहेत.

First published:

Tags: Funny video, Video viral