Home /News /viral /

VIDEO: विशालकाय अजगराला हाताने कुरवाळत बसलेली तरुणी; पुढे काय झालं पाहा

VIDEO: विशालकाय अजगराला हाताने कुरवाळत बसलेली तरुणी; पुढे काय झालं पाहा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Python Shocking Video) पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा अजगर किती मोठा आणि भीतीदायक दिसत आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता

  नवी दिल्ली 17 मे : सापाचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. सापाच्या अनेक प्रजाती अतिशय विषारी असतात. जर त्यांनी एखाद्याला चावा घेतला तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यामुळेच साप दिसताच लोक आपला मार्ग बदलतात. मात्र सध्या सापाचा एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यात एक मुलगी महाकाय अजगराला प्रेमाने कुरवाळताना दिसत आहे, जणू तो तिचा पाळीव श्वान आहे. यादरम्यान अजगरही मुलीवर हल्ला करत नाही (Girl Playing with Python). अवाढव्य अजगर मानेभोवती गुंडाळून देत होता पोझ; VIDEO चा शेवट पाहून अंगावर काटा येईल सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Python Shocking Video) पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा अजगर किती मोठा आणि भीतीदायक दिसत आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. काहींनी या मुलीची कृत्य वेडेपणाचं असल्याचं म्हटलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक महाकाय अजगर दिसत आहे. त्याचवेळी, कॅमेऱ्याचा अँगल बदलताच एक मुलगी त्या अजगराला अगदी प्रेमाने कुरवाळताना दिसते. लोक हे दृश्य पाहूनच घाबरत आहेत. साप किती लांब आणि जाड आहे ते तुम्ही पाहू शकता. पण मुलीच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नाही. ती अगदी आरामात अजगराशेजारी बसून प्रेमाने त्याच्यावरुन हात फिरवताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Munding Aji (@munding_aji)

  काही सेकंदांचा हा धक्कादायक व्हिडिओ इंस्टाग्रामवर munding_aji नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 18 एप्रिल रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत 41 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहून बहुतेक लोकांनी आश्चर्य व्यक्ती केलं की ही मुलगी एवढ्या मोठ्या आणि भयानक अजगराजवळ बसूनही घाबरत कशी नाही. अनेकांनी तिला अशा घातक प्राण्यांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. तर अनेकांनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलं अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक बिबट्याने केला नाही हल्ला; VIDEO पाहून कारण सांगू शकाल का? व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिलं आहे की, 'ही मुलगी पुढच्या वेळी दिसणार नाही कारण तोपर्यंत अजगराने तिला खाऊन टाकलं असेल.' दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिलं, 'ही मुलगी वेडी आहे. अजगरापासून दूर जा नाहीतर तो तुला जिवंत गिळेल.’ आणखी एकाने लिहिलं की, ‘सापांपासून दूर राहा, ते कधीच तुमचे मित्र होऊ शकत नाहीत.’ एकूणच या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. मात्र, अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Python, Shocking video viral

  पुढील बातम्या