मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - 40 सेकंदातच रोडरोमिओचा खेळ खल्लास; मुलीला छेडणाऱ्या तरुणाला आईनेच दिली अशी शिक्षा

VIDEO - 40 सेकंदातच रोडरोमिओचा खेळ खल्लास; मुलीला छेडणाऱ्या तरुणाला आईनेच दिली अशी शिक्षा

मुलीच्या आईने मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला भररस्त्यात चांगलीच अद्दल घडवली आहे.

मुलीच्या आईने मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला भररस्त्यात चांगलीच अद्दल घडवली आहे.

मुलीच्या आईने मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला भररस्त्यात चांगलीच अद्दल घडवली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 01 ऑक्टोबर : रस्त्याने जाता जाता मुलींची छेडछाड करणारे रोडरोमिओ कमी नाहीत. अशाच एका रोडरोमिओला एका मुलीच्या आईनेच चांगली अद्दल घडवली आहे. मुलीला छेडताच आईने भररस्त्याच त्या तरुणाला शिक्षा दिली आहे. 40 सेकंदातच त्याचा खेळ खल्लास केला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

माहितीनुसार नजीराबाद परिसरात ही मुलगी आपल्या आईसोबत खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी नशेत असलेल्या या तरुणाने तिला छेडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तिच्या आईने त्याला तिथंच धुतलं. त्यानंतर इतर लोकही जमा झाले आणि सर्वांनी मिळून त्याची धुलाई केली. तरुणाला सटासट कानाखाली मारण्यात आल्या. तिथं असलेल्यांपैकी कुणीतरी हा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

हे वाचा - भरधाव वेगाने बाईक घेऊन आलेल्या चोरांना, गार्डने घडवली अद्दल; पाहा धक्कादायक Video

व्हिडीओत पाहू शकता कसं या तरुणाला चोपलं जातं आहे. तुम्ही मोजाल तर फक्त 40 सेकंदातच त्याला 23 थप्पड लगावण्यात आले आहेत. त्यापैकी 17 कानाखाली तर मुलीच्या आईनेच मारल्या आहेत. तरुण इतका घाबरला आहे, की त्याची सर्व हिरोगिरी उतरल्याचं त्याच्या चेहऱ्यावरूनही दिसून येतं आहे.

तरुणाला धू धू धुऊन नंतर त्याला तंबी देऊन तिथून सोडून देण्यात आलं. हिरोगिरी करणारा हा तरुण गप्पपणे तिथून निघून जाताना दिसतो.

हे वाचा - रस्त्याच्या मधोमध दोन मुलींची भयंकर मारामारी, केस पकडून एकमेकींना दिले पंचवर पंच, Video Viral

छेडछाड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. स्त्रीची अब्रू लुटणं, हात धरणं, तिच्या वस्त्रांना हात घालणं अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता 354 खाली शिक्षेची तरतूद आहे. तसंच छेडछाड केल्याबदल भारतीय दंड संहिता कलम 509 अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल करता येते.

First published:

Tags: Uttar pradesh, Viral, Viral videos