मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कायच्या काय! सुंदर न दिसण्यासाठी ही तरुणी करते भलताच खटाटोप; कारण ऐकून लावाल डोक्याला हात

कायच्या काय! सुंदर न दिसण्यासाठी ही तरुणी करते भलताच खटाटोप; कारण ऐकून लावाल डोक्याला हात

25 वर्षाच्या शॅनीला भरपूर आनंद होतो, जेव्हा लोक तिला पाहून घाबरतात. आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी तिनं स्वतःचा लूक पूर्णपणे बदलला आहे

25 वर्षाच्या शॅनीला भरपूर आनंद होतो, जेव्हा लोक तिला पाहून घाबरतात. आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी तिनं स्वतःचा लूक पूर्णपणे बदलला आहे

25 वर्षाच्या शॅनीला भरपूर आनंद होतो, जेव्हा लोक तिला पाहून घाबरतात. आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी तिनं स्वतःचा लूक पूर्णपणे बदलला आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : दुनियेत अगदी वेगवेगळे छंद असणारे (Weird Habits Of People) लोक तुम्ही पाहिले असतील. काहींना टॅटू आवडतात म्हणून या व्यक्ती आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून घेतात. काहींना लांब केस आवडत असतात, त्यामुळे ते अगदी पायापर्यंत केस वाढवतात. मात्र, तुम्ही कदाचितच असा एखादा व्यक्ती पाहिला असेल, ज्याला स्वतःला कुरूप म्हणवून घ्यायला आवडत असेल. किंवा एखादी अशी महिलाही तुम्ही फारच कमी वेळा पाहिली असेल जिला लोकांनी आपल्याला चेटकीण म्हणावं असं वाटत असेल. मात्र, आज आम्ही ज्या महिलेबद्दल बोलत आहोत, तिला अशीच सवय आहे.

25 वर्षाच्या शॅनीला भरपूर आनंद होतो, जेव्हा लोक तिला पाहून घाबरतात. आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी तिनं स्वतःचा लूक पूर्णपणे बदलला आहे. शॅनीनं आपल्या शरीरावर अनेक टॅटू (Tattoo) गोंदवण्यासोबतच आपले डोळेही अतिशय भीतीदायक (Horrible Eyes of Girl) करून घेतले आहेत.

मुलाच्या एका चुकीमुळे बाप झाला कोट्यवधी; कुटुंबाला बसला आश्चर्याचा धक्का!

नुकतंच एका मेकअप आर्टिस्टनं शॅनीचा मेकओव्हर केला. शॅनीनं आपल्या शरीरावर जितके टॅटू गोंदवले आहेत ते मेकअपच्या माध्यमातून कवरअप केले. यानंतर तिला लेन्स लावण्यात आले. यानंतर ती एका साध्या मुलीप्रमाणे दिसू लागली. मात्र, आपला हा लूक पाहून शॅनी घाबरली. तिचं म्हणणं आहे, की आता नॉर्मल दिसणं तिला अगदीच विचित्र वाटतं. तिला चांगलं वाटतं, जेव्हा लोक तिला एकटक पाहत राहतात. तिला आपला चेटकीणीप्रमाणे लूक चांगलाच पसंत आहे.

शॅनीने आपला लूक चेटकीणीप्रमाणे करण्यासाठी भरपूर ट्रान्सफॉरमेशन करून घेतले. तिनं बॉडी ट्रान्सफॉरमेशनमध्ये अनेक टॅटू, कानाचे होल अधिक मोठे बनवणं आणि आपल्या डोळ्यांचा रंग बदलणं असं बरंच काही केलं. तिनं सांगितलं, की कोणी तिच्याकडे पाहत राहिलं नाही तर तिला वेगळंच वाटतं. नुकतंच तिनं एका टीव्ही शोमध्ये भाग घेतलेला. यात मेकअप आर्टिस्टनं तिचा लूक बदलून तिला नॉर्मल मुलीप्रमाणे लूक दिला. मात्र, स्वतःला सामान्या रुपात पाहून ती घाबरली.

खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत, VIDEO

शॅनीनं डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की जेव्हा मेकअपनंतर तिनं स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा ती घाबरली. हा नॉर्मल लूक तिच्यासाठी भीतीदायक होता. सध्या तिच्या या मेकअप लुकला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी तिला असंच राहण्याची विनंती केली आहे. मात्र, शॅनीला कधीही असं ट्रान्सफॉरमेशन करण्याची इच्छा नाही.

First published:

Tags: Viral news