मराठी बातम्या /बातम्या /Viral /GPay-PhonePay नंतर आता KissPay? Viral Video मुळे पेमेंटची नवी पद्धत चर्चेत

GPay-PhonePay नंतर आता KissPay? Viral Video मुळे पेमेंटची नवी पद्धत चर्चेत

काय आहे किस-पे? (प्रतीकात्मक फोटो)

काय आहे किस-पे? (प्रतीकात्मक फोटो)

किस-पे म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

नवी दिल्ली, 26 मे : पूर्वीच्या काळी वस्तुविनिमय पद्धती जगात चालत असे. या व्यवस्थेत लोक एका वस्तूची दुसऱ्यासाठी देवाणघेवाण करत असत. हळूहळू चलनाचे युग आलं. नोटा किंवा नाण्यांच्या माध्यमातून लोक व्यवहार करू लागले. आता तर ऑनलाइन पेमेंट केलं जातं, ज्यासाठी जीपे, फोनपे, पेटीएम असे कित्येक पेमेंट अॅप उपलब्ध आहेत. दरम्यान आता यानंतर किसपेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

किस-पेचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. फोनपे, जीपे नंतर आता किसपे आलं की काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या व्हिडीओत एक तरुणी दुकानाजवळ दिसते आहे. जी दुकानदाराला किस करते आहे. कुणीतरी गुपचूप हा व्हिडीओ शूट केला आहे आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जो तुफान व्हायरल होतो आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दुकानाबाहेर असलेल्या तरुणीने कदाचित दुकानातून काही वस्तू खरेदी केल्या. थोडा वेळ ती इकडे तिकडे पाहते. कुणी आपल्याला पाहत नाही ना, याची खात्री करून घेते. आपल्या आसपास कुणी नाही हे समजल्यावर ती दुकानदाराला किस करताना दिसते.

Social Media Trend फॉलो करताय सावधान! तुमच्या जीवाला धोका, एकाचा मृत्यू

दुकानाबाहेर उभ्या असलेल्या तरुणीने दुकानात बसलेल्या तरुणाला किस करणं याचा संबंध नव्या पेमेंट पद्धतीशी जोडला जातो आहे. लोकांच्या मते, आता गुगल पे फोन पे जुनं झालं. आता पेमेंटची ही नवी पद्धत किसपे आली आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे माहिती नाही. मुलगी आणि दुकानदार एकमेकांना आधीपासून ओळखत होते का? मुलीने दुकानदाराला वस्तूंच्या बदल्यात किस दिलं का?, हे स्पष्ट झालेलं नाही. न्यूज 18 लोकमत या व्हिडीओची पडताळणी करत नाही. फक्त हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यावर तशा कमेंट येत आहेत. म्हणून हा व्हिडीओ तुम्हाला दाखवण्यात आला आहे.

प्रेम म्हणावं की वेड? सरबत पिताना मृत पत्नीचा फोटो काढून वृद्धाने काय केलं पाहा

@kasaragodpage इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos