मराठी बातम्या /बातम्या /Viral /

..अन् तरुणीने सायकलसह उंच डोंगरावरुन घेतली उडी; अंगावर काटा आणणारा VIDEO

..अन् तरुणीने सायकलसह उंच डोंगरावरुन घेतली उडी; अंगावर काटा आणणारा VIDEO

यात दिसतं की एका उंच टेकडीवर एक मुलगी सायकल घेऊन उभी आहे. त्यावेळी तिच्या शेजारी आणखी एक मुलगी उभी असलेली दिसते. इतक्यात सायकलवर असलेली तरुणी सायकलसह पुढे सरकते आणि टेकडीवरून उडी घेते

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 एप्रिल : तुम्ही चित्रपटांमध्ये सायकल स्टंटचे अनेक धोकादायक व्हिडिओ पाहिले असतील, पण खऱ्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला उंच टेकडीवरून सायकलवर धोकादायक स्टंट करताना पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ (Shocking Bicycle Stunt Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी सायकलसह उंच टेकडीवरून खाली उडी मारताना दिसते. व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

जिवंत हरणाची शिकार करणारा अजगर कॅमेऱ्यात कैद; अंगाचं पाणी पाणी करणारा VIDEO

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचे सायकलसोबतच हे स्टंट पाहून तुम्ही थक्क व्हाल (Girl Jumped from High Hill with Bicycle). असा स्टंट तुम्ही याआधी कदाचितच पाहिला असेल. यात दिसतं की एका उंच टेकडीवर एक मुलगी सायकल घेऊन उभी आहे. त्यावेळी तिच्या शेजारी आणखी एक मुलगी उभी असलेली दिसते. इतक्यात सायकलवर असलेली तरुणी सायकलसह पुढे सरकते आणि टेकडीवरून उडी घेते. हे दृश्य खूपच रोमांचक आहे.

व्हिडीओमध्ये पुढे दिसतं की, टेकडीवरून उडी मारल्यानंतर मुलगी सुखरूप जमिनीवर पोहोचते. यानंतर, ती वेगाने सायकल चालवते आणि समोर दिसणारी दुसरी टेकडी चढते. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल, कारण ती ज्या टेकडीवर चढते ती खूप उंच टेकडी आहे. उंच ठिकाणी चढणं इतकं सोपं नाही. मात्र, ही तरुणी अगदी सहजपणे टेकडीवर चढताना दिसते.

VIDEO - आधी गाडीवरून खाली कोसळला नंतर मागून आली कार आणि...; पुढे जे घडलं ते थक्क करणारं

व्हिडिओमध्ये पाहून असं अजिबात वाटत नाही की, एवढा धोकादायक स्टंट करताना ही तरुणी घाबरली आहे. हा व्हिडिओ beautiful destinations नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत 95 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच 60 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाइक केला आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली की, 'थोडीही चूक या तरुणीसाठी जीवघेणी ठरू शकत होती.'

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video