व्हिडीओत पाहू शकता एक कार उभी आहे आणि त्याच्यासमोर एक तरुणी आहे. ही तरुणी धावत त्या कारच्या दिशेने येते. सुरुवातीला ती स्टंटवर पाय ठेवते. हवेत उडते आणि हवेत उडतच ती फ्लिम करते. एकाच फ्लिपमध्ये ती कारच्या एका बाजूने कारच्या दुसऱ्या बाजूला जाते. तरुणीला असं करताना पाहून आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. हे वाचा - OMG! बोट आहे की जादूची छडी? तरुणाच्या इशाऱ्यावरच कसे नाचतात उंदीर पाहा VIDEO या तरुणीचा बॅलेन्स थोडा जरी बिघडला असता तर तिच्या जीवाला धोका पोहोचू शकला असता. व्हिडीओच्या शेवटीसुद्धा तिचा तोल किंचितसा ढासळल्याचं दिसतो आहे. पण आपल्या आत्मविश्वाच्या जोरावर ती तेसुद्धा अगदी छानपणे निभावून नेते. जणू आपल्यासोबत काही झालंच नाही असंच ती तरुणी दाखवते आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत त्याच आत्मविश्वासाने ती कॅमेऱ्यात पाहते. हे वाचा - धुराचे लोट सोडत हवेत उडून धाडकन कोसळली कार; भयंकर अपघातातून बचावला ड्रायव्हर gaddiyan_wale इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे. तरुणीच्या टॅलेंटवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Shocking viral video, Stunt video, Viral, Viral videos