आपल्या मुलांचं नाव
(Children Name) इतकं वेगळं असावं की लोकांनी त्याविषयी चर्चा करावी, असं सगळ्याच पालकांना
(Parents) वाटतं. अशाच एका आईनं तिच्या मुलीचं नाव इतकं लांबलचक ठेवलं की त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
(Guinness World Record) नोंद तर झालीच पण या मुलीचा जन्म दाखला
(Birth certificate) देखील एक जागतिक आश्चर्य ठरला. या मुलीच्या जन्म दाखल्याची लांबी चक्क 2 फूट आहे. या मुलीच्या नावात चक्क 1019 अक्षरांचा समावेश आहे.
सध्या मुलांची नावं अपारंपारिक असावीत असा एक ट्रेण्ड (Trend) आहे. काही जण केवळ अक्षरांची निवड करून नाव ठेवतात तर काही जण अजूनही धार्मिक ग्रंथांत शोधून नाव ठेवतात. एका महिलेनं तिच्या मुलीचं नाव 1000 शब्दांत ठेवलं आहे. आता हे नाव लिहिताना हात तर दुखतातच पण संपूर्ण नाव उच्चारताना घामदेखील फुटतो.
असामान्य नावामुळं मिळाली ओळख
प्रसिद्ध टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रेच्या
(Oprah Winfrey) शोमध्ये सहभागी होत या आई-मुलीच्या जोडीनं लांबलचक नावाविषयी माहिती दिली. यावेळी मुलीच्या आईनं सांगितलं की `जागतिक विक्रमात नोंद व्हावी, यासाठी मी जाणूनबुजून मुलीचं नाव असं ठेवलं`. 1997 मध्ये आई-मुलीच्या जोडीनं या नावामागील कथा सांगितली होती. सॅंड्रानं सांगितलं की, ``माझ्या मुलीचं नाव वेगळं आणि जागतिक विक्रमात समाविष्ट होईल असं असावं, हे मला वाटत होतं. मुलीचं नाव इतकं लांबलचक आहे की ते दर्शवण्यासाठी ग्राफिक टीमला विशेष मेहनत घ्यावी लागली``. जेव्हा मुलीनं तिचं लांबलचक नाव अगदी सहजपणे सांगितलं तेव्हा लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण या नावाचा उच्चार तोंड थकवणारा आहे.
कमालच झाली! चक्क एका माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO
1019 अक्षरांपासून तयार झालेलं अनोखं नाव
12 सप्टेंबर 1984 रोजी मुलीचा जन्म झाल्यानंतर सॅंड्रानं तिच्या पतीच्या नावातील अक्षरांसह मुलीचं नाव निवडलं. तिनं प्रथम Rhoshandiatellyneshiaunneveshenk Koyaanisquatsiuth Williams हे नाव मुलीच्या जन्म दाखल्यावर नोंदवलं. परंतु हे नाव देखील सॅंड्राला कमी लांबीचं वाटलं. त्यामुळे तिनं 1019 अक्षरांचं नवं तयार केलं त्यात 36 अक्षरांच्या मिडल (Middle Name) आणि सरनेमची (Surname) जोड दिली. या लांबलचक नावामुळं मुलीचा जन्म दाखला 2 फूट लांबीचा झाला होता.
Rhoshandiatellyneshiaunneveshenkescianneshaimondrischlyndasaccarnae renquellenendrasamecashaunettethalemeicoleshiwhalhinive’onchellecaundenesheaalausondrilynnejeanetrimyranaekuesaundrilynnezekeriakenvaunetradevonneyavondalatarneskcaevontaepreonkeinesceellaviavelzadawnefriendsettajessicannelesciajoyvaelloydietteyvettesparklenesceaundrieaquenttaekatilyaevea’shauwneoraliaevaekizzieshiyjuanewandalecciannereneitheliapreciousnesceverroneccaloveliatyronevekacarrionnehenriettaescecleonpatrarutheliacharsalynnmeokcamonaeloiesalynnecsiannemerciadellesciaustillaparissalondonveshadenequamonecaalexetiozetiaquaniaenglaundneshiafrancethosharomeshaunnehawaineakowethauandavernellchishankcarlinaaddoneillesciachristondrafawndrealaotrelleoctavionnemiariasarahtashabnequckagailenaxeteshiataharadaponsadeloriakoentescacraigneckadellanierstellavonnemyiatangoneshiadianacorvettinagodtawndrashirlenescekilokoneyasharrontannamyantoniaaquinettesequioadaurilessiaquatandamerceddiamaebellecescajamesauwnneltomecapolotyoajohny aetheodoradilcyana Koyaanisquatsiuth Williams. हे या मुलीचं पूर्ण नाव आहे. खुद्द मुलीलाही तिचं नाव लक्षात ठेवण्यासाठी रिपीट टेप ऐकावी लागली. जेमी हे टोपणनाव असलेल्या या मुलीला तिच्या अनोख्या नावामुळं खूप प्रसिध्दी आणि लोकप्रियता मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.