नवी दिल्ली, 19 मे : इंटरनेटच्या जगात अनोख्या, विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक अनोखा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगी दिसते आहे. हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यानंतर मुलीचं अर्ध शरीर सिमेंट काँक्रिटमध्ये अडकलं आहे, असं वाटतं. परंतु याची सत्यता पडताळणी केली असता, काही वेगळंच समोर आलं आहे. अमेरिकेतील एका महिलेने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोवरुन अनेक लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. या फोटोवरुन अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. हा फोटो एडिटिंगद्वारे करण्यात आला आहे, की खरोखरच मुलगी सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यामध्ये अडकली आहे, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.
अमेरिकेतील एका महिलेने आपल्या मुलीचा हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, की हा दृष्टीचा भ्रम आहे की एखादी अनोखी टेक्निक वापरली गेली आहे.
हा फोटो या महिन्याच्या सुरुवातील रेडिटवर पोस्ट करण्यात आला होता, ज्यात गुलाबी रंगाचे कपडे घातलेली मुलगी काँक्रिटमध्ये अडकली आहे, असं वाटतं. ती खेळताही दिसतेय. या फोटोच्या खाली त्या महिलेने लिहिलंय, माझ्या मुलीच्या शरीराचा इतर भाग कुठे आहे? मी पाहू शकत आहे, तुम्ही हे कोड सोडवू शकता का, असा सवालही तिने केला आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

अखेर या फोटोमागचा उलगडा झाला आहे. ही मुलगी एका उंच ठिकाणी उभी आहे, जे काँक्रिटच्या बॉर्डरशी जुळतंय. खाली असलेला काँक्रिटचा रस्ता आणि उंच ठिकाणी असलेली बॉर्डर एकमेकांशी जुळल्याने, ती मुलगी सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यामध्ये अडकली असल्याचं वाटतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.