Home /News /viral /

बॉसने दिलेली विचित्र चिठ्ठी वाचून हादरली तरुणी; पहिल्याच दिवशी सोडली नोकरी

बॉसने दिलेली विचित्र चिठ्ठी वाचून हादरली तरुणी; पहिल्याच दिवशी सोडली नोकरी

या तरुणीला बॉसकडून एकरा पॉईंट (Weird Rules for Employees) असलेली अजब चिठ्ठी मिळाली. यातील एक-एक पॉईंट वाचून तुम्हीही हैराण व्हाल

    नवी दिल्ली 09 डिसेंबर : आई-वडिलांसाठी सर्वात आनंदाची बाब असते आपल्या मुलांना शिकवून मोठं करून आपल्या पायावर उभा करणं. न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या एका पित्यालाही याच गोष्टीचा आनंद होता, की त्यांच्या मुलीला पहिली नोकरी मिळाली आहे. मात्र, हा आनंद पहिल्याच दिवशी संपला, जेव्हा त्यांच्या मुलीनं कामाच्या पहिल्याच दिवशी बॉसकडून मिळालेली चिठ्ठी आपल्या वडिलांना दाखवली (Girl Got Weird Letter From Boss). चिठ्ठी पाहून भडकलेल्या वडिलांनी @essjax नावाच्या अकाऊंटवरुन ही बाब जगासमोर मांडली आणि सांगितलं की त्यांच्या मुलीला नोकरीच्या पहिल्याच दिवशी हे मिळालं. या तरुणीला बॉसकडून एकरा पॉईंट (Weird Rules for Employees) असलेली अजब चिठ्ठी मिळाली. यातील एक-एक पॉईंट वाचून तुम्हीही हैराण व्हाल. हेही वाचा - OMG! डोळ्याची पापणी न मिटता एकटक तासभर सूर्याकडे बघत राहिला हा व्यक्ती मुलीच्या वडिलांनी जी चिठ्ठी शेअर केली आहे त्यातील अकरा पॉईंट पुढीलप्रमाणे आहेत - जीवन न्यायपूर्ण नाही, त्यासाठी तयार रहा. जग तुमच्या स्वाभिमानाचा विचार करत नाही. स्वतःबद्दल चांगले वाटण्यापूर्वीही तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या जातात. हायस्कूलमधून बाहेर पडताच तुम्हाला करोडोंच्या नोकऱ्या मिळत नाहीत. तुम्हाला कार आणि फोन देऊन उपराष्ट्रपती बनवले जात नाही. जर तुम्हाला वाटत असेल की शिक्षक कडक आहेत, तर बॉस येण्याची वाट पहा. बर्गर फ्लिप करण्याच्या कामाला कमी लेखू नका. तुमचे आजी आजोबा याकडे संधी म्हणून बघायचे. तुम्ही चूक केल्यास ती तुमच्या पालकांची चूक नाही. त्यातून तुम्हीच शिका. तुमचा जन्म होण्यापूर्वी तुमचे पालक इतके कंटाळवाणे नव्हते. जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर ते असे झाले. शाळेत जिंकण्या आणि हरण्याने फरक पडत नसला तरी आयुष्यात पडतो आयुष्यात कोणतेही सेमिस्टर नाहीत आणि इथे कोणाला तुम्हाला मदत करण्यातही रस नाही. काय करायचं आहे याचा स्वतःच विचार करा. टेलिव्हिजन हे खरे जग नाही. वास्तविक जीवनात, तुम्हाला कॉफी शॉपमध्ये नाही तर कामावर जावं लागतं. मूर्खांसोबतही चांगले वागा, कदाचित तुम्हाला त्यांच्यासोबत कामही करावे लागेल. हेही वाचा - दही खाण्यासाठी पाकिस्तानी चालकाने मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO पाहून व्हाल शॉक जेव्हा मुलीच्या वडिलांनी हे संपूर्ण नियम सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी लिहिलं की, या गोष्टी कर्मचाऱ्याला सांगायची काय गरज आहे? त्याचवेळी, काही वापरकर्त्यांनी यापैकी काही टिप्स जीवनात खूप महत्त्वाच्या असल्याचे सांगितले आहे. मात्र, ज्या मुलीला हे पत्र मिळालं होतं, तिने ही नोकरी सोडली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Job, Viral news

    पुढील बातम्या