इस्लामाबाद, 30 जून : विवाह सोहळ्यादरम्यान नाचणाऱ्या महिलेला तरुणानं लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नमंडपात सर्वांसमोर या तरुणानं महिलेला लाथ मारल्यानं मोठी खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. महिलेला लाथ जोरात बसल्यानं डान्स करताना तोल जाऊन महिला खाली कोसळली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
डेली मेलननं दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ पाकिस्तानच्या खैबर पख्तूनखा भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. ही महिला लग्नाच्या कार्यक्रमात नाचत होती. दरम्यान, कोल्ड ड्रिंकची बाटली हातात असलेली एक व्यक्ती या महिलेच्या छातीवर जोरात लाथ मारतो. त्यानंतर महिला खाली पडते त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा-गायींच्या कळपात एकट्या बदकानं घेतला पंगा, पुढे काय झालं पाहा VIDEO
या महिलेच्या डान्सवर नाराज असल्यानं तरुणानं असं केल्याची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे. तर ही महिला लग्नात अश्लील चाळे करत नाचत असल्यानं तरुणानं हे केल्याचं काही लोकांचा दावा आहे. हा तरुण कोण आहे किंवा त्याचा या महिलेशी काय संबंध आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संपादन- क्रांती कानेटकर