मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे बाप! ही मुलगी आहे की...; Horror film सारखा Real Video Viral; पाहूनच फुटेल घाम

बापरे बाप! ही मुलगी आहे की...; Horror film सारखा Real Video Viral; पाहूनच फुटेल घाम

मुलीने असं काही केलं जे पाहून बहुतेक नेटिझन्स शॉक झाले आहेत.

मुलीने असं काही केलं जे पाहून बहुतेक नेटिझन्स शॉक झाले आहेत.

मुलीने असं काही केलं जे पाहून बहुतेक नेटिझन्स शॉक झाले आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 मार्च : तुम्ही बऱ्यात भूताच्या कथा ऐकल्या असतील, वाचल्या असतील. घोस्ट व्हिडीओ (Real Ghost video), हॉरर फिल्म (Horror film) पाहिल्या असतील. यामध्ये भूताचे पाय सामान्यपणे उलटे असल्याचं दाखवलं जातं. ही एडिंगची कमाल असते किंवा दुसरा काहीतरी जुगाड असतो, प्रत्यक्षात हे शक्य नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे असं काही पाहून फार आश्चर्य वाटत नाही. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने हॉरर फिल्ममधील या अशा सीन्सनाही मागे टाकलं आहे (Girl flexibility video).

एका मुलीच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मुलीने असं काही करून दाखवलं आहे, जे आपण एरवी हॉरर फिल्म किंवा व्हिडीओत पाहतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल किंबहुना दरदरून घामही फुटेल. व्हिडीओ पाहणाऱ्या बहुतेक नेटिझन्सची अशीच अवस्था झाली आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी खुर्चीवर पाठमोरी बसली आहे. पण तुम्ही नीट पाहिलं तर दिसेल तिची पाठ दिसत असली तरी तिचे पाय मात्र पुढच्या दिशेने आहेत. जणू काही दोन व्यक्ती एकमेकांसमोर बसल्या आहेत, असं वाटतं. पण त्यानंतर ही मुलगी हळूच वळते. तेव्हा मात्र धक्काच बसतो.

हे वाचा - VIDEO - रॉक क्लायम्बिंगवेळी स्टंट पडला भारी! भल्यामोठ्या दगडाला धडकला आणि...

खुर्चीवर जे पाय दिसत आहेत, ते दुसऱ्या कुणाचे नाहीतर तर याच मुलीचे आहेत. जी पाठमोरी बसली असतानाही सरळ दिशेने आहेत. जशी मुलगी वळते तसं तिचं कंबरेपासूनचं धड फक्त हलतं. पण तिचे पाय तसेच राहतात आणि ती सामान्य स्थितीत बसते.

View this post on Instagram

A post shared by Video Nation (@nation.video)

मुलीची फ्लेक्सिबलिटी पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. किंबहुना व्हिडीओ पाहूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. इतकी लहान मुलगी इतक्या कमी वयात असं कसं काय करू शकते, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हे वाचा - VIDEO-चिमुकल्या हातात धरली बंदूक आणि...; नेटकरी म्हणाले, 'मृत्यूशी खेळतोय मुलगा'

मुलीच्या टॅलेंटचं कौतुक केलं जातं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी या मुलीची तुलना भूताशी केली आहे. रात्रीच्या वेळी या मुलीला बाहेर पाठवू नका किंवा असं काही करायला लावू नका, नाहीतर लोक खूप घाबरतील, असा सल्ला काही युझर्सनी तिच्या पालकांना दिला आहे. तर काही युझर्सनी ही महिला आहे आणि ती काहीही करू शकते, असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Stunt video, Viral, Viral videos