Home /News /viral /

PUBG खेळताना दोघांच्या प्रेमात पडली तरुणी; दोघंही सोबतच भेटण्यासाठी पोहोचले अन्...

PUBG खेळताना दोघांच्या प्रेमात पडली तरुणी; दोघंही सोबतच भेटण्यासाठी पोहोचले अन्...

एका तरुणीला PUBG गेम खूप आवडायची. ती ऑनलाइन PUBG गेम खेळायची. सुमारे दोन वर्षांपूर्वी या तरुणीची राजस्थानमधील एका तरुणासोबत पबजी गेम खेळताना मैत्री झाली होती.

    नवी दिल्ली 16 मे : तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे लोक मित्र बनले आणि नंतर प्रेमात पडले. परंतु तुम्ही कधी ऐकलं आहे का, की PUBG गेम (PUBG Game) खेळताना लोक प्रेमात पडले आहेत. या कथेतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे PUBG खेळताना एक मुलगी एका मुलाच्या नव्हे तर दोन मुलांच्या प्रेमात पडली (Girl Fell in Love with 2 Boys). त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे तिने दोघांनाही एकाच दिवशी भेटायला बोलावलं. स्टेजवर अचानक असं काही आठवलं की नवरीने मध्येच थांबवलं लग्न, कारण जाणून चक्रावून जाल उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून हे विचित्र प्रकरण समोर आलं आहे. इथे राहणाऱ्या एका तरुणीला PUBG गेम खूप आवडायची. ती ऑनलाइन PUBG गेम खेळायची. सुमारे दोन वर्षांपूर्वी या तरुणीची राजस्थानमधील एका तरुणासोबत पबजी गेम खेळताना मैत्री झाली होती. यानंतर दोघांनीही आपापले मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केले आणि त्यानंतर दोघांमध्ये फोनवरून संवाद सुरू झाला. फोनवर बोलल्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुललं. आश्‍चर्याची बाब म्हणजे महिनाभरापूर्वी ऑनलाइन पबजी खेळत असताना तरुणीची उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे राहणाऱ्या आणखी एका तरुणाशी मैत्री झाली. तरुणी या तरुणासोबतही प्रेमाच्या गोष्टी करू लागली. यानंतर तिने दोन्ही तरुणांना हल्द्वानीला भेटण्यासाठी बोलावलं. या मुलीला भेटण्यासाठी दोन्ही तरुणांनी मिळून हल्दवानी गाठलं. दोन्ही तरुण समोरासमोर आल्यावर त्यांनी तरुणीसोबतचं आपलं नातं सांगण्यास सुरुवात केली. यावरून दोघंही एकमेकांशी भिडले आणि दोघांनीही एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आश्चर्य! एकाच वेळी प्रेग्नंट, डिलीव्हरीही एकाच दिवशी; जुळ्या बहिणींची मुलंही आता Same to Same हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचताच पोलिसांनी दोन्ही तरुणांना पकडून कोतवालीला आणलं. शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही तरुणांवर कारवाई केली. यादरम्यान या प्रकरणाची संपूर्ण हकीकत समोर आली. पोलिसांनी सांगितलं की, भोटिया पडव चौकी परिसरात राहणारी ही मुलगी दोन्ही मुलांसोबत प्रेमाचा खेळ खेळली. ही मुलगी दोन्ही तरुणांच्या PUBG गेमने इतकी प्रभावित झाली की दोघांसोबतही प्रेमाचा खेळ करू लागली. मात्र, तरुणीने दोन्ही तरुणांना एकत्र का बोलावलं, हेही पोलिसांना समजलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Viral news

    पुढील बातम्या