मराठी बातम्या /बातम्या /Viral /बॉयफ्रेंडसोबत मॉलमध्ये आलेल्या तरुणीची झाली भलतीच फजिती; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी दिले अजब सल्ले

बॉयफ्रेंडसोबत मॉलमध्ये आलेल्या तरुणीची झाली भलतीच फजिती; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी दिले अजब सल्ले

एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत काहीतरी खरेदी करण्यासाठी जाते. मात्र, तिला थकल्यासारखं वाटल्याने ती जवळच ठेवलेल्या कार्टन बॉक्सवर बसण्याचा प्रयत्न करते

एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत काहीतरी खरेदी करण्यासाठी जाते. मात्र, तिला थकल्यासारखं वाटल्याने ती जवळच ठेवलेल्या कार्टन बॉक्सवर बसण्याचा प्रयत्न करते

एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत काहीतरी खरेदी करण्यासाठी जाते. मात्र, तिला थकल्यासारखं वाटल्याने ती जवळच ठेवलेल्या कार्टन बॉक्सवर बसण्याचा प्रयत्न करते

नवी दिल्ली 11 डिसेंबर : सोशल मीडियाचं (Social Media) जग अगदी वेगळंच आहे. इथे दररोज काही ना काही नवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होत आहेत. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. यात दिसतं की एक तरुणी मॉलमध्ये शॉपिंगसाठी आलेली दिसते. मात्र याबद्दल जे काही घडतं याचा विचारही या तरुणीने केला नसेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मी़डियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की कुठेही बसण्याआधी एकदा विचार नक्कीच करावा.

हेही वाचा - तरुणांना डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पुढे जे घडलं ते धक्कादायक

हा व्हिडिओ केवळ 16 सेकंदाचा आहे. मात्र, नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे काहीच तासात व्हिडिओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ एखाद्या शॉपिंग कॉम्ल्पेक्समधील असल्याचं जाणवतं. इथे एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत काहीतरी खरेदी करण्यासाठी जाते. मात्र, तिला थकल्यासारखं वाटल्याने ती जवळच ठेवलेल्या कार्टन बॉक्सवर बसण्याचा प्रयत्न करते. यानंतर जे काही घडतं त्याचा या तरुणीनं विचारही केला नसेल. बॉक्सवर बसताच ही तरुणी धाडकन खाली कोसळते (Girl Fell Down After Sitting on Carton Box). तरुणीचं वजन जास्त असल्याने लगेचच हा बॉक्स तुडतो.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने याला कॅप्शन देत लिहिलं, सावध राहा. हा व्हिडिओ लोकांच्या किती पसंतीस उतरत आहे, याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की शेअर केल्यावर काहीच तासांत २० लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा आकडा सातत्याने वाढतच आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी महिलेला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी तिची मस्करी केली आहे.

हेही वाचा - मोबाईल रिचार्ज करून दिला तरीही सोडून गेली अन्...; तरुणाने मांडली व्यथा, VIDEO

एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं की या व्हिडिओतून हे शिकायला मिळतं की कुठे पण बसू नये. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, वजन कमी कर दीदी. तर आणखी एकाने लिहिलं, जिमनंतर मॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न कर.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Shopping