मराठी बातम्या /बातम्या /Viral /

म्हशीसमोर ठुमके पडले भारी; डान्स करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

म्हशीसमोर ठुमके पडले भारी; डान्स करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

तरुणीचा डान्स पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली म्हैस

तरुणीचा डान्स पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली म्हैस

म्हशीसमोर डान्स करणाऱ्या तरुणीसोबत म्हशीने जे केलं ते पाहून पोट धरून हसाल.

  मुंबई, 11 ऑगस्ट : मुके जीव शांत तर शांत पण जर ते चवताळले तर ते काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे काही लोक पाळीव प्राण्यांपासूनही दोनहात लांबच राहतात. पण काही जण मुद्दाम त्यांच्याशी पंगा घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक तरुणी म्हशीसमोर डान्स करायला गेली. पण म्हशीसमोर डान्स करणं तिला महागात पडलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल पण तुम्हाला हसूही आवरणार नाही. एका तरुणीने म्हशीला चारा देताना तिच्यासमोर डान्स करण्याचा प्रयत्न केला. पण म्हशीसमोर डान्स करण्याचा असा परिणाम होईल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. तिचा डान्स पाहून म्हैसही आऊट ऑफ कंट्रोल झाली. इथं तरुणीने ठुमका लगावला आणि दुसऱ्या क्षणी म्हशीने तिला शिंगांनी उडवून दिलं. हे वाचा - VIDEO - आधी हवेत उडवून जमिनीवर आपटलं नंतर खुपसत राहिला शिंगं; चवताळलेल्या रेड्याने तरुणाची केली भयंकर अवस्था व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी बादलीत चारा घेऊन म्हशींजवळ पोहोचते. दोन म्हशींच्या मध्ये ती उभी आहे. एका म्हशीसमोर जाते हातातील बादली ठेवते आणि त्यानंतर ती तिथंच उभी राहून डान्स करू लागते. कधी ठुमके लगावते, कधी हातवारे करते. काही क्षणातच म्हैस तिला आपल्या शिंगाने जोरात धडक देते. मुलगी तिथल्या कुंडात पडते. त्यानंतर तिला उठताही येत नाही.
  psycho_biharii2 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. "आ भैंस मुझे मार"  असं कॅप्शन या युझरने या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - Video - सिंहांच्या कळपात घुसून जंगलाच्या राजालाच आपटून आपटून मारलं; भारी पडला एकटा रेडा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तरुणीचा डान्स कदाचित म्हशीला आवडला नसावा असं बहुतेक युझर्सनी म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Funny video, Pet animal, Viral, Viral videos

  पुढील बातम्या