• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पैशांसाठी काहीही! ATM समोर डोकं टेकलं, हात जोडले; तरुणीने काय काय केलं पाहा VIDEO

पैशांसाठी काहीही! ATM समोर डोकं टेकलं, हात जोडले; तरुणीने काय काय केलं पाहा VIDEO

तरुणीचा एटीएममधील व्हिडीओ व्हायरल.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑक्टोबर : पैसे (Money) मिळाले तर त्याचा आनंद कुणाला होणार नाही. हा आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुणी पैसे मिळताच सर्वात आधी ते देवासमोर ठेवतं, कुणी त्यापैकी काही पैसे दान करतं, तर कुणी कुटुंब किंवा मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करतं. पण एका तरुणीने मात्र पैसे मिळाल्याचा असा आनंद व्यक्त केला आहे, जो तुम्ही कधी पाहिलाच नसेल. एटीएममध्ये (ATM) पैसे काढल्यानंतर तरुणीच्या आनंदाला पारावर उरला नाही (Girl danceing in front of atm). तिला इतका आनंद झाला की उत्साहात तिने एटीएममध्येच धिंगाणा घातला आहे. तिने चक्क एटीएममध्ये डान्स केला आणि हो महत्त्वाचं म्हणजे तिने एटीएमसमोर डोकं टेकलं आणि हातही जोडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
  व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी एटीएम मशीनसमोर उभी आहे. एटीएममधून पैसे येण्याची ती प्रतीक्षा करते आहे. मध्येच ती अचानक नाचू लागते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे पगार मिळाल्याचा आनंद पाहत आहात का? हे वाचा - लेकाने केला भलताच प्रयोग, जीव मुठीत धरून राहिले वडील; पाहा VIDEO आपल्या मेहनतीने पैसे कमावणं यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नसतो. असाच आनंद या तरुणीलाही झाला आहे. त्यामुळे ती पगाराचे पैसे काढायला जेव्हा एटीएममध्ये गेली तेव्हा तिने तिथंच डान्स केला. जेव्हा पैसे आले तेव्हा तिने आपलं कार्ड आणि पैसे हातात घेतले. त्यानंतर एटीएम मशीनवर तिने डोकं टेकलं आणि हातही जोडले. त्यानंतर ती तिथून बाहेर पडली. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: