नवी दिल्ली 04 डिसेंबर : मुलं आणि इतर जबाबदाऱ्यांपासून मोकळा वेळ मिळाला की कपल एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. मात्र आई-वडिलांसाठी घरामध्ये रोमान्स (Couple Romance) करणं थोडं अवघड असतं. कारण मुलं त्यांना एकटं सोडत नाहीत. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात ज्यात मुलांनी आई-वडिलांनाच लाजवलं. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला आपल्या पतीचा मूड रोमँटिक बनवण्यासाठी त्याच्या जवळ जाते. मात्र इतक्यात त्यांच्या मुलीची तिथे एण्ट्री होते आणि हे पाहून ती डोळे बंद करून घेते.
इन्स्टाग्राम अकाऊंट कपल्स रील्सवर काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला गेला होता, जो अतिशय विनोदी आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपलं काम करताना दिसत आहे तर समोरच त्याची पत्नी उभा आहे, जी व्हिडिओमध्ये दिसत नाही. कॅमेरा वॉशबेसिनजवळ ठेवला गेला आहे. महिला यादरम्यान असं काही करते की पती तिच्याकडेच पाहत राहतो. मात्र यानंतर जे घडतं ते अतिशय मजेशीर आहे.
सोशल मीडियावर एक चॅलेंज व्हायरल होत आहे ज्याचं नाव आहे 'म्हणा की उष्णता जास्त आहे आणि आपले कपडे काढा' (Say it’s Hot and Take Your Clothes Off Challenge). या चॅलेंजमध्ये गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंज आपल्या पार्टनरसमोर उभा राहून असं करतात आणि मग पार्टनरच्या रिअॅक्शनचा व्हिडिओ शेअऱ करतात. सध्या आम्ही ज्या व्हिडिओबद्दल बोलत आहोत, त्यातही असंच काहीसं घडलं. महिलेनं आपल्या काम करणाऱ्या पतीसमोर उभा राहात म्हटलं की खूप गरम होत आहे आणि ती आपले सर्व कपडे काढू लागली. मात्र इतक्यात महिलेची मुलगी तिथे आली.
View this post on Instagram
महिला कपडे काढत असतानाच मुलगी आपला फोन हातात घेऊन तिथे येते. अचानक आईला विनाकपडे समोर पाहून ती लाजते आणि आपले डोळे बंद करून चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवते. हे संपूर्ण दृश्य पाहून तिचे वडील मोठमोठ्याने हसू लागतात. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार हा व्यक्ती मुलीचा सावत्र वडील आहे. या कपलला वाटलं की त्यांची मुलगी बाहेर आहे, त्यामुळे ते रोमान्सचा प्लॅन करू लागले. मात्र इतक्यात तिथे त्यांची मुलगी आली. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 3 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.