• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • वाढदिवस विसरल्यानं बॉयफ्रेंड रूसला; हताश तरुणीनं थेट पोलिसांनाच केला फोन अन्...

वाढदिवस विसरल्यानं बॉयफ्रेंड रूसला; हताश तरुणीनं थेट पोलिसांनाच केला फोन अन्...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या तरुणीच्या बॉयफ्रेंडचा एक दिवस आधी वाढदिवस होता. मात्र, यादिवशी बॉयफ्रेंडला शुभेच्छा द्यायला ती विसरली. याच कारणामुळे बॉयफ्रेंड नाराज झाला

 • Share this:
  नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : जेव्हा दोन लोक रिलेशनशिपमध्ये (Relationship) येतात तेव्हा त्यांच्यात वाद सुरुच असतात. मात्र अनेकदा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधील वाद (Boyfriend and Girlfriend Fight) इतका वाढतो की तो सोडवण्यासाठी इतरांनाही मध्ये यावं लागतं. असंच एक अजब प्रकरण नुकतंच मध्य प्रदेशातून समोर आलं आहे. हे प्रकरण यामुळे अजब आहे कारण हे भांडण सोडवण्यासाठी थेट पोलिसांनाच हस्तक्षेप करावा लागला. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छिंदवाडामधील (Chhindwara) आपल्या नाराज असलेल्या बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी गर्लफ्रेंडनं थेट पोलिसांचीच मदत घेतली. या तरुणीच्या बॉयफ्रेंडचा एक दिवस आधी वाढदिवस होता. मात्र, यादिवशी बॉयफ्रेंडला शुभेच्छा द्यायला ती विसरली. याच कारणामुळे बॉयफ्रेंड नाराज झाला आणि तो या तरुणीसोबत बोलत नव्हता. यामुळे तिनं थेट पोलिसांनाच फोन करून मदत मागितली. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, युवतीनं पोलिसांना फोन करून सांगितलं की तिचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलणं करून द्यावं. यानंतर छिंदवाडा पोलिसांनी अर्ध्या रात्री या दोघांना ठाण्यात बोलावलं. पोलिसांनी आधी पोलीस ठाण्यातच दोघांची समजूत काढली आणि यानंतर त्यांचं लग्नही लावलं. या घटनेबाबत बोलताना पोलिसांनी सांगितलं, की या तरुणीचा रात्री साडेअकरा वाजता फोन आला. पोलिसांना भीती वाटली की ही तरुणी टोकाचं पाऊलही उचलू शकते. य़ामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तरुणाला अर्ध्या रात्री ठाण्यात बोलावलं. पोलिसांनी दोघांनाही छिंदवाडा पोलीस ठाण्यात बोलवत त्यांची समजूत काढली. यानंतर पोलिसांनी लग्नाबाबत विचारणा केली. दोघांचे कुटुंबीयही लग्नासाठी तयार झाल्याने पोलिसांनी या जोडप्याचं लग्न लावून दिलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: