Home /News /viral /

'मी कधीपासून अटक होण्याची वाट बघत होते'; पोलिसांनी ताब्यात घेताच तरुणीचा आनंद गगनात मावेना

'मी कधीपासून अटक होण्याची वाट बघत होते'; पोलिसांनी ताब्यात घेताच तरुणीचा आनंद गगनात मावेना

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर एका अमेरिकन तरुणीने पोलिसांना जे सांगितले ते धक्कादायकच नाही तर मजेदारही होतं

    नवी दिल्ली 17 मे : जगात सर्व प्रकारचे लोक आहेत आणि त्यांची स्वतःच्या काही वेगळ्या इच्छा किंवा स्वप्न आहेत. कधीकधी आपण लहानपणापासून काहीतरी इच्छा बाळगतो, परंतु त्या पूर्ण करू शकत नाही. जीवनात कधीतरी आपली ही हौस पूर्ण करण्याची इच्छा म्हणजेच आपली बकेट लिस्ट असते. प्रत्येकाची बकेट लिस्ट वेगळी असते. मात्र, यात कोणाची अटक होण्याची इच्छा असेल, असा विचार तरी तुम्ही करू शकता का? (Weird Bucket List) मात्र आता अशी विचित्र इच्छा असलेल्या तरुणीची कहाणी समोर आली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर एका अमेरिकन तरुणीने पोलिसांना जे सांगितले ते धक्कादायकच नाही तर मजेदारही होतं (Girl Becomes Happy after Being Arrested). Honeymoon Trip चं गिफ्ट पडलं भारी; हनीमून सोडून पळालं कपल कारण... अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या १९ वर्षीय जानिया या तरुणीची ही विचित्र इच्छा सध्या चर्चेत आहे. सामान्यत: लोकांची इच्छा आकाशात उडणे, समुद्रात डुबकी मारणे, मोठ्याने गाणं म्हणणं किंवा सहलीला जाणं असते, परंतु जानियाची इच्छा वेगळीच होती. तिला वाटायचं की आयुष्यात एकदा तरी तिला पोलिसांनी अटक करून तुरुंगात नेलं पाहिजे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने वाहतूकीचा नियम मोडला. मिररच्या रिपोर्टनुसार, होमस्टेडमध्ये राहणारी 19 वर्षीय जानिया सकाळी 7.47 वाजता वेगात गाडी चालवताना पोलिसांना दिसली. Monroe County Sheriff कडून जानियावर वाहनाच्या लाईट्स चालू ठेवून वेगाने वाहन चालवण्याचा आणि क्रॉसरोडवर थांबल्याचा आरोप करण्यात आला. जेव्हा पोलिसांनी तिला ही चूक सांगितली आणि कारवाईची माहिती दिली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. सार्जंट रॉबर्ट डोश म्हणतात की तिने त्यांना सांगितलं की - 'पोलिसांनी अटक करावी ही तिची शाळेत असतानापासूनची इच्छा होती'. किचनमध्ये अचानक लागली आग, महिला विझवायला गेली पण शेवटी...; थरकाप उडवणारा LIVE VIDEO या प्रकरणी जानियाला अटक करण्यात आली आणि पोलिसांपासून पळून गेल्याने तिची तुरुंगात रवानगी झाली. ही विचित्र घटना पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर बहुतेकांना हे जाणून आश्चर्य वाटलं की एवढ्या लहान वयात तुरुंगात जाण्याची कुणाची मनापासून इच्छा कशी काय असू शकते? यावर एका यूजरने कमेंट केली की, बहुतेक वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत मानवी मेंदूचा विकास पूर्ण होत नाही. फ्लोरिडामध्ये घडलेली ही पहिली विचित्र घटना नाही. इथे अनेकदा लहान मुलांना बंदुकीसोबत घराबाहेर पडल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Police arrest, Traffic Rules, Viral news

    पुढील बातम्या