मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गिरीश महाजनांच्या सभागृहात डुलक्या; शेलारांनी कोपरखळी मारताच देऊ लागले घोषणा, भन्नाट VIDEO व्हायरल

गिरीश महाजनांच्या सभागृहात डुलक्या; शेलारांनी कोपरखळी मारताच देऊ लागले घोषणा, भन्नाट VIDEO व्हायरल

विधानसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात गिरीश महाजन यांना डुलक्या लागण्याचा प्रकार घडला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर जोरदार टीका करत असतानाच हा प्रकार घडला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 मार्च: विधानसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना डुलक्या (Nap) लागण्याचा प्रकार घडला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) राज्य सरकारवर जोरदार टीका करत असतानाच हा प्रकार घडला आहे. यावेळी गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागच्या बाकावर बसले होते. तर त्यांच्या बाजूला आशिष शेलार बसले होते. फडणवीस भाषण देत असतानाच त्यांच्या मागे बसलेले महाजन सभागृहातचं डुलक्या मारताना दिसले आहे. हा सर्व प्रकार लाइव्ह टेलिकास्ट कॅमेरात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणकीस गांभीर्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलत होते. यावेळी त्यांच्या मागच्याच आसनावर बसलेले गिरीश महाजन चक्क डुलक्या घेत होते. दरम्यान हा प्रकार आशिष शेलार यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी हाताच्या कोपऱ्यांने महाजनांना धक्का दिला. यानंतर महाजन खडबडून जागे झाले, आणि काहीच घडलं नाही अशा तोऱ्यात घोषणा देऊ लागले. पण हा सर्व प्रकार सभागृहातील कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा-हेमा मालिनीच्या गालाशी रस्त्यांची तुलना करणाऱ्या मंत्र्याला करावी लागली पायपीट

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी सभागृहात चर्चा सुरू असताना गिरीश महाजन फिरत फिरत सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसले होते. त्यावर प्रकाश सोळंके यांनी आक्षेप घेतला. महाजन सत्ताधारी पक्षात आले का? असा मिश्किल सवालही सोळंके यांनी यावेळी विचारला. यानंतर महाजन तातडीनं विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले.

हेही वाचा-आता राष्ट्रवादी IT च्या रडारवर; अजित पवारांच्या 3 बहिणींच्या कंपन्यांवरही छापे

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या साऱ्या प्रसंगाची तुलना 'जाने भी दो यारो' चित्रपटामधील महाभारताच्या सीनशी केलीय. या चित्रपटामध्ये महाभारत सादर करताना भिमाची भूमिका साकारणारं पात्र स्टेजवरचं डुलकी लागल्याने झोपतं आणि त्यालाही शेजारी बसलेली व्यक्ती झोपेतून उठवते असं दाखवण्यात आलंय. या दोन्ही प्रसंगांची तुलना करत सचिन सावंत यांनी, “चित्रपट- भाजपा ची नौटंकी… लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन” अशा कॅप्शनसहीत व्हिडीओ शेअर केलाय.

First published:

Tags: Girish mahajan, Vidhansabha