शांत उभ्या असलेल्या जिराफाची खोड काढायला आला गेंडा पुढे काय झालं पाहा VIDEO

शांत उभ्या असलेल्या जिराफाची खोड काढायला आला गेंडा पुढे काय झालं पाहा VIDEO

जिराफाची खोड काढणं गेंड्याला चांगलंच महागात पडलं आहे. नेमकं काय घडलं पाहा मजेशीर VIDEO

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : जंगलातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी लढाईचे तर कधी प्राण्यांचे मजा मस्ती करतानाचे. काही दिवसांपूर्वी जिराफानं खाण्यासाठी जुगाज केला होता. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता जिराफाची कळ काढणाऱ्याला त्यानं कसा धडा शिकवला याचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.

जिराफ तसं शांत आणि सुस्वाभी अनेक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत पण त्याची कुणी खोडी काढली तर काय होऊ शकतं ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. या व्हिडीओमध्ये आपण पाहिलं तर गेंड्याचं छोटं पिल्लू जिराफाची खोड काढायला येत आणि त्याला जिराफ मागून लाथ मारतं. लाथ तोंडावर बसल्यानंतर हे पिल्लू धाव मारत पळत सुटतं.

वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 12 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. 146 लोकांनी आतापर्यंत रिट्वीट केला आहे. तर युझर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

हे वाचा-प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत अभियान; महाराष्ट्र सरकार धडा घेणार का?

जिराफ आणि गेंडाच्या या अनोख्या युद्धाचा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ सामायिक करताना नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ते लिहितात, "ही किक गेंडा संपूर्ण आयुष्य लक्षात ठेवेल. आपल्याला माहित आहे की जिराफ कोणत्याही दिशेने लाथ मारू शकतो. आणि आपण सांगू शकता की कोणता प्राणी सर्वात जोरदार लाथ मारतो. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 23, 2020, 11:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या