Home /News /viral /

मस्ती करणं गेंड्याला पडलं महागात; एका लाथेतच जिराफाने घडवली आयुष्यभराची अद्दल, VIDEO

मस्ती करणं गेंड्याला पडलं महागात; एका लाथेतच जिराफाने घडवली आयुष्यभराची अद्दल, VIDEO

व्हायरल होणारा व्हिडिओ एखाद्या प्राणीसंग्रहालयातील वाटतो. यात जिराफाच्या मागेच एक गेंडा फिरताना दिसला. गेंड्यानं जिराफाच्या मागे उभा राहात त्याला त्रास देण्यास सुरुवात केली

    नवी दिल्ली 02 डिसेंबर : आजपर्यंत अनेकदा तुम्ही इव टीजिंगचे (Eve Teasing) व्हिडिओ पाहिले असतील. सोबतच मस्करीत लोकांसोबत होणाऱ्या मस्तीचे व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. मात्र हेच तुम्ही दोन प्राण्यांच्यात कधी पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर एक जिराफ आणि गेंड्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गेंडा मोठ्या जिराफाला छेडताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीये (Giraffe Rhino Video). व्हायरल होणारा व्हिडिओ एखाद्या प्राणीसंग्रहालयातील वाटतो. यात जिराफाच्या मागेच एक गेंडा फिरताना दिसला. गेंड्यानं जिराफाच्या मागे उभा राहात त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. जिराफानेही थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच गेंड्याला जोराची लाथ मारली (Giraffe kicked Rhino). जिराफाने लाथ मारताच गेंडा इतका घाबरला की त्याने लगेचच तिथून धूम ठोकली. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. भारतीय वन सेवेतील अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, गेंडा जिराफाची लाथ आयुष्यभर लक्षात ठेवेल. या व्हिडीओसोबत अधिकाऱ्याने लोकांना काही ज्ञानही दिलं. जिराफ कोणत्याही दिशेने लाथ मारू शकतो, याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सला एक टास्कही दिला. त्यांनी विचारलं की, "तुम्ही सांगू शकाल का जगातील सर्वात वेगवान किकर कोण आहे? त्यांनी लोकांना गुगलचा सहारा घेऊ नये अशी विनंती केली. सुसंता नंदा अनेकदा ट्विटरवर जंगली प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ शेअर करत राहतात. त्यांच्या या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Wild animal

    पुढील बातम्या