मुंबई, 27 नोव्हेंबर : गेंड्याला (Rhinoceros video), किती भलामोठा, जाडजुड असतो हे तुम्हाला माहितीच आहे. अशाच गेंड्याला एका जिराफाने (Giraffe video) फक्त एक किक देत उडवलं आहे (Giraffe kick rhinoceros). तसं शरीराने जिराफापेक्षाही भारी असलेल्या गेंड्यालाही जिराफाची ताकद समजली (Giraffe rhino video) आणि त्याने तिथून धूम ठोकली. जिराफ आणि गेंड्याचा (Giraffe rhinoceros video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
जंगली प्राण्यांमध्ये (Wild Animal video) इतर प्राण्यांपेक्षा (Animal video) सर्वात शांत प्राणी म्हणजे जिराफ. तसा तो शक्यतो कुणाला हानी पोहोचवत नाही. पण जर कुणी त्याच्या वाकड्यात शिरलं तर मग त्याचीही खैर नाही. त्या प्राण्याला तो चांगलाच धडा शिकवतो, हे एका जिराफाने दाखवून दिलं आहे. अगदी त्याच्यापेक्षा भारी असलेल्या गेंड्यालाही त्याने सोडलं नाही (Giraffe rhino video).
The kick that the rhinoceros will remember for life... Do you know that a giraffe can kick in any direction? And can u guess which animal has the strongest kick in the world? No google please. pic.twitter.com/tHjX7WsiQh
— Susanta Nanda (@susantananda3) October 22, 2020
जिराफाने गेंड्याला आयुष्यभर लक्षात राहिल अशी अद्दल घडवली आहे. जिराफ काय यापुढे कदाचित तो कोणत्याच्या प्राण्याच्या वाट्याला जाणार नाही.
हे वाचा - माणसाला बिलगुन हुंदके देत रडू लागली कोंबडी; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावुक
व्हिडीओत पाहू शकता एक जिराफ उभा आहे. त्याच्या मागून एक गेंडा येतो आणि त्याला त्रास देऊ लागतो. जिराफ सुरुवातीला शांतच असतो. पण गेंडा काही त्रास देणं थांबवत नाही हे समजताच त्याचाही संयम तुटतो. गेंडा त्याच्या मागच्या पायाजवळ येतातच आपले काटीसारखे पाय वाकवत जिराफ त्याला लाथ मारतो. बस्सं जिराफाची एक किकच गेंड्याला इतकी भारी पडते की तो तिथून पळतच सुटतो.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. गेंडा आयुष्यभर जिराफाची लाथ लक्षात ठेवेल असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
हे वाचा - बापरे! जंगलाचा कायदा बदलतोय; शाकाहारी ओरांगउटाननं केली माकडाची शिकार
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अशाच मजेशीर कमेंट येत आहेत. आता गेंडा कुणालाही त्रास देणार शंभर वेळा विचार जरूर करेल, गेंड्याला दिवसा तारे नक्कीच दिसले असतील, जिराफाच्या लाथेत गाढवाच्या लाथेपेक्षाही जास्त दम असतो, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal