Home /News /viral /

कारच्या खिडकीत अडकलं जिराफाचं डोकं...आणि पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

कारच्या खिडकीत अडकलं जिराफाचं डोकं...आणि पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

कारमध्ये जिराफाचं डोकं अडकतं आणि तेवढ्यात असं काही होतं की, सर्वच जण हैराण होतात. जिराफाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे.

  मुंबई, 10 डिसेंबर : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ एका जिराफचा आहे, जो कारमध्ये त्याचं डोकं घालतो आहे. कारमध्ये जिराफाचं डोकं अडकतं आणि तेवढ्यात असं काही होतं की, सर्वच जण हैराण होतात. इंग्लंडच्या वूस्टरशायर येथील वेस्ट मिडलँड सफारी पार्कमध्ये पती-पत्नी कारमधून फिरण्यासाठी आले होते. त्यांची कार रस्त्यालगत उभी असताना, त्यावेळी एक जिराफ येऊन उभा राहिला. यावेळी कारच्या खिडकीची एक काच खुली होती. खुली काच असलेल्या बाजूला एक महिला बसलेली होती. जिराफने कारच्या खुल्या खिडकीतून त्याचं डोकं थेट कारमध्ये टाकलं. जिराफच्या या कृतीने ती महिला इतकी घाबरली की, तिने घाई-गडबडीमध्ये कारची काच बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिराफचं डोकं कारच्या खिडकीत अडकलं.

  (वाचा - 8 इंचाच्या अजगराला घरी घेऊन आली व्यक्ती; पाहता पाहता झाला 18 फूट VIDEO VIRAL)

  जिराफ त्याचं डोकं कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच, खिडकीची काच फुटली. पण सुदैवाने यात जिराफला कोणतीही ईजा झालेली नाही. यावेळी बाजूलाच असलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. दरम्यान, या पार्कमध्ये फिरताना सफारीचे काही नियम-कायदे आहेत. परंतु त्या नियमांचं या पर्यटकांनी योग्यरित्या पालन केलं गेलं नाही आणि त्यामुळेच कारची कारच फुटली.

  (वाचा - भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO)

  सफारी नियमांनुसार, येथे फिरताना कारची खिडकी बंद ठेवली जाणं गरजेचं आहे, परंतु व्हिडीओमध्ये या पर्यटकांनी कारची खिडकी खुलीच ठेवली आणि हा संपूर्ण प्रकार घडला. जिराफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Video viral

  पुढील बातम्या