मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Oh no! खाणं भरवताना भल्यामोठ्या माशाने व्यक्तीचा हातही खाल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO

Oh no! खाणं भरवताना भल्यामोठ्या माशाने व्यक्तीचा हातही खाल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO

व्यक्ती मोठ्या माशाला छोटा मासा भरवायला गेला पण त्याने त्याचा हातच आपल्या तोंडात घेतला.

व्यक्ती मोठ्या माशाला छोटा मासा भरवायला गेला पण त्याने त्याचा हातच आपल्या तोंडात घेतला.

व्यक्ती मोठ्या माशाला छोटा मासा भरवायला गेला पण त्याने त्याचा हातच आपल्या तोंडात घेतला.

मुंबई, 14 मे : आपण कुठे फिरायला गेलो की पर्यटनस्थळी असलेल्या पक्ष्यांना (Feeding birds), प्राण्यांना खायला (Feeding animals) घालायला आपल्याला खूप आवडतं. समुद्रातून प्रवास करत असताना आकाशात उंच उडणारे पक्षी आणि पाण्यातील मासे (Feeding fish video) यांना तर आपण हमखास खायला देतोच. पण मासे किंवा पक्षी यांना खायला घालताना आपणही सावध राहायला हवं, नाहीतर काय होऊ शकतं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

माशांना खायला घालणाऱ्या एका व्यक्तीचा हा व्हिडीओ आहे (Fish attack while feeding). स्वतःच्या हातांनी माशाला खायला घालताना या व्यक्तीचा हातही भल्यामोठ्या माशाने आपल्या जबड्यात धरला. व्हिडीओ पाहताच आपल्या हृदयाचा ठोका चुकतो. धडकी भरवणारा हा असा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत पाहू शकता पाण्यात बरेच मासे दिसत आहेत. पाण्याच्या वर एक जाळं लावण्यात आलं आहे. त्यावर आडवं राहून ही व्यक्ती माशाला खाणं देते आहे. आपल्या हातात एक छोटा मासा धरून ही व्यक्ती त्या जाळीवर आडवी झोपली आहे. व्यक्तीचा हात खाली पाण्याच्या दिशेने आहे. हातात मासा धरून ती मोठ्या माशाला बोलावते आहे.

हे वाचा - कपडे काढून वॉटरफॉलखाली झोपला, अचानक कोसळला साप आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

मासा पाहताच मोठा मासा वेगाने तिथं येतो. पाण्याच्या बाहेर झेप घेत तो माशावर ताव मारतो. पण माशासोबत तो मासा ज्या व्यक्तीने धरला आहे, त्या व्यक्तीचा हातही हा मासा आपल्या तोंडात घेतो.

View this post on Instagram

A post shared by Sam Cook (@samcook.photos)

बराच वेळ मासा त्या व्यक्तीचा हात आपल्या तोंडात धरून ठेवतो. तशी व्यक्तीही माशाच्या तावडीतून सुटण्याची झटापट करताना दिसत नाही. कारण त्याच्या तोंडातून हात खेचून काढल्याने त्याला दुखापत होऊ शकते, याची माहिती त्याला आहे. त्यामुळे तोही तसाच स्थिर राहतो. काही वेळाने मासा स्वतःच त्या व्यक्तीचा हात आपल्या तोंडातून सोडताना दिसतो.

हे वाचा - VIDEO: मागून येत हिंस्त्र बिबट्याचा व्यक्तीवर हल्ला; कॅमेऱ्यात कैद झाली थरकाप उडवणारी घटना, पुढे काय झालं पाहा

सुदैवाने माशाने त्या व्यक्तीला काही गंभीर दुखापत केली नाही किंवा व्यक्तीसोबत काही वाईट घडलं नाही. व्हिडीओचा शेवट पाहून कुठे आपल्या जीवात जीव येतो. @samcook.photos इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

First published:

Tags: Fish, Other animal, Viral, Viral videos