Home /News /viral /

VIDEO: घराच्या दरवाजात बसली होती तरुणी; अचानक जवळ आला विशालकाय साप अन्..; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO: घराच्या दरवाजात बसली होती तरुणी; अचानक जवळ आला विशालकाय साप अन्..; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या घराच्या दारात बसलेली दिसत आहे. ती तिचे केस व्यवस्थित करत होती, इतक्यात अचानक तिची नजर आपल्या बाजूला जाते आणि ती घाबरून जोरात ओरडते आणि उभी राहते.

  नवी दिल्ली 25 एप्रिल : टीव्हीवर किंवा प्राणीसंग्रहालयासारख्या एखाद्या ठिकाणी पिंजऱ्याच्या आत साप दिसला, तरी भीतीने आपल्याला घाम फुटतो. मात्र जर साप तुमच्या समोरून तुमच्या घरात शिरला तर तुमची काय अवस्था होईल? या परिस्थितीत हा साप विषारी आहे की नाही, या सगळ्याचा विचार करण्याचंही आपल्या सुचत नाही आणि हे दृश्य पाहून अक्षरशः थरकाप उडतो.. नुकतंच असंच काहीसं एका तरुणीसोबत घडलं, जेव्हा तिला तिच्या घरात एक मोठा साप दिसला (Giant Snake Enter House). VIDEO शूट करण्यात मग्न होती तरुणी; मागून आलेल्या हत्तीनं केलेलं कृत्य पाहून पुरती घाबरली व्हायरल हॉग या प्रसिद्ध सोशल मीडिया अकाऊंटवर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा अपलोड केले जातात. यातील अनेक व्हिडिओ हैराण करणारे असतात तर अनेक व्हिडिओ मजेशीरही असतात. मात्र या अकाऊंटवर नुकताच जो व्हिडिओ (Snake Shocking Video) शेअर करण्यात आला आहे तो अजिबातही विनोदी नाही. हा व्हिडिओ अतिशय भीतीदायक आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ViralHog (@viralhog)

  व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या घराच्या दारात बसलेली दिसत आहे. ती तिचे केस व्यवस्थित करत होती, इतक्यात अचानक तिची नजर आपल्या बाजूला जाते आणि ती घाबरून जोरात ओरडते आणि उभी राहते. तिला आपल्याशेजारुन साप घरात चालल्याचं दिसतं (Snake Entering House). यानंतर कॅमेऱ्यात एक साप कैद झालेला दिसतो जो वेगाने घराच्या आत येत असतो. हे पाहून तरुणी इतकी घाबरते की ती आत येण्याची हिंमतही करत नाही. सापही घरात सरपटत जातो आणि नंतर तो कॅमेऱ्यात दिसणं बंद होतं. यानंतर ही तरुणी हळूच आत येते आणि इकडे तिकडे साप शोधू लागते. हा व्हिडिओ इथेच संपतो. मात्र, साप अचानक समोर आल्यावर या युवतीची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो. काय सांगता! संपूर्ण ट्रक वरुन गेला तरीही अंडं सुरक्षित; हे कसं घडलं? पाहा VIDEO व्हिडिओला 21 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की तो व्हिडिओ आशियातील कुठल्यातरी देशाचा आहे असं दिसतं. आणखी एका व्यक्तीने म्हटलं की, त्याला फार पूर्वीच समजलं होतं, की जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा नेहमी दार बंद करूनच जा. आणखी एकाने लिहिलं की, आता एक रूममेट त्या मुलीसोबत राहायला आला आहे. याशिवाय या घटनेनंतर काय झालं आणि साप घराबाहेर कसा पडला हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Snake video

  पुढील बातम्या