'गुलाम'मधील अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, व्हायरल VIDEO आला समोर

'गुलाम'मधील अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, व्हायरल VIDEO आला समोर

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे टीव्ही मालिका आणि सिनेमांचे देखील शूटिंग बंद होते. परिणामी अनेक छोट्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जून : कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमांचे देखील शूटिंग बंद होते असल्याने अनेक छोट्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशाच एका अभिनेत्यापैकी एक जावेद हैदर (Javed Hyder) या अभिनेत्यावर भाजीविक्री करण्याची वेळ आली आहे. हैदरने गुलाम, चांदनी बार या चित्रपटांमध्ये तर जिनी और जुजू सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. अभिनेत्री डॉली बिंद्रा (Dolly Bindra)ने जावेद हैदरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्रीने हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. भाजी विकताना देखील हा अभिनेता एका वेगळ्या शैलीमध्ये भाजी विकत आहे. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक तर होचच आहे. पण त्याची ही अवस्था झाल्याने सोशल मीडियावर अनेकांनी सहानुभूती देखील व्यक्त केली आहे.

(हे वाचा-VIDEO : साप, कोळी की आणि काही? सरपटणाऱ्या विचित्र प्राण्याला पाहून नेटकरी हैराण)

लॉकडाऊनमुळे अनेक कलाकार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेकांनी या परिस्थितीपुढे हार मानली आहे. मात्र जावेद हैदरने भाजी विक्री करण्याचा निर्णय घेऊन आयुष्याशी संघर्ष सुरू ठेवल्याने त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

(हे वाचा-कोण सर्वात शक्तिशाली? हल्ला करणाऱ्या बिबट्याला कुत्र्याने लावलं पळवून,पाहा VIDEO)

(हे वाचा-जिराफाशी पंगा नकोच! गाडीचा पाठलाग करतानाचा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क)

First published: June 28, 2020, 7:33 AM IST

ताज्या बातम्या